
नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa
जमिनीच्या वादातून नेवासा तालुक्यातील पिंपरीशहाली येथे तिघांना कोयत्याने मारहाण केल्याची घटना घडली असून याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत बन्सी रंगनाथ नवथर (वय 60) रा. पिंपरी शहाली यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 21 जुलै रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मी घरी काम करत असताना जमिनीच्या वादातून अर्जुन बबन नवथर याने त्याच्या हातातील कोयत्याने माझ्या डाव्या दंडावर कोपरावर व पाठीवर कोयत्याने मारुन गंभीर दुखापत केली.
संभाजी रंगनाथ नवथर याने माझा मुलगा योगेश यास त्याच्या हातातील दांड्याने पाठीत व डोक्यात मारुन जखमी केले. बबन रंगनाथ नवथर याने मोठा मुलगा अमोल यास दांड्याने पाठीत माहाण केली तसेच शिवाजी रंगनाथ नवथर व प्रदीप संभाजी नवथर यांनी शिवगाळ, दमदाटी करुन जीवे मारण्याची धमकी दिली.
या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी वरील पाच जणांवर भारतीय दंङ विधान कलम 326, 323, 504, 506, 143, 147, 149 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक श्री. गडाख करत आहेत.