पिंपरी निर्मळ सोसायटी निवडणुकीत जनसेवा ग्रामविकास सरासरी मतदानात अव्वल

पिंपरी निर्मळ सोसायटी निवडणुकीत जनसेवा ग्रामविकास सरासरी मतदानात अव्वल

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ गावातील राजकीयदृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या पिंपरी निर्मळ सोसायटी निवडणुकीत जनसेवा ग्रामविकास मंडळाच्या उमेदवारांना सरासरी 506 मते मिळाली असल्याने सरासरी मतदानात जनसेवा ग्रामविकास मंडळ अव्वल ठरले आहे.

पिंपरी निर्मळ सोसायटीची निवडणूक प्रथमच तिरंगी झाली. माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे प्रणीत जनसेवा ग्रामविकास मंडळ व जनसेवा मंडळ या दोन पॅनलसह महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शेतकरी मंडळात तिरंगी लढत झाली. यामध्ये 13 जागांसाठी 36 उमेदवार रिंगणात होते. 1077 मतदारांनी मतदान केले. यामध्ये जनसेवा ग्रामविकास मंडळाच्या बारा उमेदवारांचा विजय झाला तर विरोधी जनसेवा मंडळाला एका जागेवर समाधान मानावे लागले. शेतकरी मंडळानेही पहिल्याच निवडणुकीत नऊ जागा लढत चांगली मते मिळवत चुरस तयार केली.

यामध्ये सरासरी मते मिळविण्यात जनसेवा ग्रामविकास मंडळ अग्रेसर राहिले असून मंडळाच्या तेरा उमेदवारांना एकूण 6579 मते मिळाली. सरासरी एका उमेदवाराला यामध्ये 506 मते मिळाली आहेत.तर विरोधी जनसेवा मंडळाच्या तेरा उमेदवारांना एकूण 4338 मते मिळाली. सरासरी एका उमेदवाराला यामध्ये 318 मते मिळाली आहेत. तिसर्‍या शेतकरी मंडळाने प्रथमच निवडणुकीत सहभाग घेवून नऊ उमेदवार उभे केले होते. त्यांना एकूण 2230 मते मिळाली सरासरी एका उमेदवाराला यामध्ये 248 मते मिळाली आहेत. विशेष बाब म्हणजे मंडळाच्या नऊ उमेदवारांपैकी दोन उमेदवार दोन नंबरवर राहिल्याने सर्वांच्या भुवया उचावल्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com