
पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal
राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ सेवा सोसायटीकडून चालू वर्षाकरिता खरीप पीक कर्ज वाटपास सुरूवात करण्यात आली आहे. खरीपाच्या दोन महिने आधीच कर्ज वितरणाची व्यवस्था झाल्याने सभासदांमधून समाधान व्यक्त होत आहे.
शंभर वर्षाची परंपरा असलेल्या पिंपरी निर्मळ सेवा सोसायटीचा साडेसात कोटीच्या आसपास वार्षिक व्यवहार आहे. संस्था जिल्हा बँकेच्या माध्यमातून सभासदांना सोयाबीन, डाळींब, ऊस, फळबागा या पीक कर्जाबरोबर पशुधन व मध्यम तसेच दिर्घ मुदतीचे शेती आधारीत कर्जाचे वाटप करते. चालू आर्थिक वर्षात मार्च अखेर संस्थेचा अडीच कोटीच्यां वर वसूल झाला होता. त्यामुळे वेळेवर पीक कर्जाची परतफेड करणार्या शेतकर्यांना अडचण होवू नये यासाठी सेवा सोसायटीने जिल्हा बँकेच्या माध्यमातून खरीप पीक कर्जाचे वाटप सुरु केले आहे.
जिल्हा बँकेचे तालुका विकास अधिकारी श्री. गुळवे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखाधिकारी श्री. देवकर, सेवा संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब घोरपडे, उपाध्यक्ष संपत घोरपडे, संचालक डॉ. विकास निर्मळ, कैलास घोरपडे, अशोक जपे, विलास घोरपडे, अलकाताई निर्मळ, देवराम इल्हे यांचेसह सचिव बाबासाहेब निर्मळ, सहसचिव भागवत शेलार कर्ज वितरणासाठी परीश्रम घेत आहेत.
माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था सभासदांच्या हितासाठी कार्यरत आहे. सध्या सोयाबीन व ऊस पिकाचे पीक कर्ज वाटप सुरू झाले असून येत्या आठवड्यात फळबागा व पशुधनासाठीचे अल्प मुदतीचे पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहे. सभासदांनी बँकेच्या धोरणाप्रमाणे कर्ज मागणी अर्ज सस्थेकडे द्यावेत, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष भाऊसोहब घोरपडे यांनी केले आहे.