करोना संकटकाळात पिंपरी निर्मळमध्ये 250 रुग्ण

10 मृत्यू; साडेतीन हजार लसीकरण
करोना संकटकाळात पिंपरी निर्मळमध्ये 250 रुग्ण
करोना

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

करोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला. राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ गावामध्ये गेल्या सव्वा वर्षात करोनाचे जवळपास 250 रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी 240 रुग्ण ठणठणीत बरे झाले असून दहा रुग्णांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे तर लसीकरणामध्येही गावाने आघाडी घेतली असून जवळपास साडेतीन हजार व्यक्तींना प्रतिबंधात्मक लसीचे डोस मिळाले आहेत.

करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जग वेठीस धरले गेले. वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी देशासह राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला. आरोग्य यंत्रणेसह जीवनावश्यक बाबी वगळता सर्व बाबी बंद करण्यात आल्या. इतिहासात प्रथमच संपूर्ण मनुष्यप्राणी घरात बंदिस्त झाला. शाळा, दुकाने, मंदिर, व्यावसायिक प्रतिष्ठान या काळात बंद राहिल्या. मात्र सर्व उपाययोजना करूनही करोनाचा संसर्ग रोखणे शक्य झाले नाही. ग्रामीण भागातही या विषाणूंचा प्रादुर्भावाचा फटका अनेकांना बसला.

पिंपरी निर्मळ येथे करोना काळात अद्यापपर्यंत 250 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी दहा रुग्णांचा दुदैवी मृत्यू झाला असून 240 ठणठणीत बरे झाले आहे. करोनावर नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक लसीकरणाला वेग आला आहे. त्या अंतर्गत पिंपरी निर्मळ गावात पहिला व दुसरा डोस मिळून जवळपास साडेतीन हजार ग्रामस्थांचे लसीकरण झाले आहे. करोनाचे संकट टळले नसून रुग्ण सापडत आहे. नागरिकांनी कोविड नियमांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभाग व पंचायत प्रशासनाकडून वेळोवेळी केले जात आहे.

Related Stories

No stories found.