पिंपरकणे पुलाचे काम निकृष्ट पद्धतीने - माजी उपसभापती मधुकर पिचड

पिंपरकणे पुलाचे काम निकृष्ट पद्धतीने - माजी उपसभापती मधुकर पिचड

अकोले |प्रतिनिधी| Akole

तालुक्यातील पिंपरकणे (Pimparkane) पुलाचे काम निकृष्ट (Bridge work inferior) पद्धतीने सुरू असून या पुलाच्या कामाची चौकशी (Bridge Work Investigation) करावी, अशी मागणी धरणग्रस्त शेतकरी व माजी उपसभापती मधुकर रामचंद्र पिचड (Madhukar Ramchandra Pichad) यांनी केली आहे.

श्री. पिचड यांनी काल धरणग्रस्त शेतकरी (Dam affected farmers), वाळीबा पिचड, रामू भांगरे, प्रकाश पिचड, शिवाजी पिचड यांचे समवेत पुलाच्या कामाला भेट दिली. असता पिलर कामात खोदाई केलेले मुरम मिश्रित दगड टाकून त्यावर काँक्रिट टाकण्याचे काम सुरू होते. त्यावेळी मधुकर पिचड (Madhukar Ramchandra Pichad) यांनी या कामात पक्का दगड टाकून साइडला लोखंडी प्लेट मारून काम करा अशी विनंती केली त्यात पक्केपणा दिसत नाही असे म्हणताच ठेकेदाराचा (Contractor) माणूस म्हणाला, काम लवकर वरती आणायचे आहे.

तुमची काही तक्रार असेल तर लोकप्रतिनिधीला भेटा. त्यामुळे संतप्त झालेल्या धरणग्रस्त ग्रामस्थांनी जलसंपदा विभागाच्या (Water Resources Department) अधिकार्‍यांची माजी आमदार वैभवराव पिचड (Former MLA Vaibhavrao Pichad) यांचेकडे तक्रार केली. व काम चांगले व्हावे ही आमची इच्छा असून काम निकृष्ट पद्धतीने केल्यास काम बंद पाडण्याचा इशारा (Hint) देण्यात आला आहे. याबाबत जलसंपदा विभागाचे अधिकारी वाकचौरे यांनी प्रत्यक्ष कामावर येऊन दगड गोटे, मुरूम माती बांधकामात टाकू नये अशा सूचना देऊ नाही ठेकेदार मात्र खालच्या बांधकामात मुरूम दगड टाकत असल्याचे निदर्शनास आल्याने ग्रामस्थांनी यात सुधारणा न झाल्यास काम बंद पाडण्याची भूमिका घेतली आहे.

पुलाचे काम धीम्या गतीने सुरू असून काम देखील निकृष्ट पद्धतीने सुरू आहे. पुलाच्या जागेवर माझी शेती होती मी विस्थापित झालो मात्र त्या जमिनीवर चालू असलेले काम चांगले व्हावे ही प्रामाणिक इच्छा आहे. ठेकेदार चांगले काम करीत नसेल तर सहन करणार नाही काम बंद पाडू.

- मधुकर पिचड (धरणग्रस्त)

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com