पिंपरी निर्मळ पाणी योजना ठरली ग्रामस्थांसाठी वरदान

पिंपरी निर्मळ पाणी योजना ठरली ग्रामस्थांसाठी वरदान

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari

वर्षानुवर्षे पिण्याच्या पाण्यासाठी शासनाच्या टँकरवर (Government Water Tanker) अवलंबून असणार्‍या राहाता (Rahata) तालुक्यातील पिंपरी निर्मळ (Pimpari Nirmal) गावाला येथील पाणीपुरवठा योजना (Water supply scheme) वरदान ठरली आहे. गावठाणसह वाड्यावस्त्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा (Drinking water supply) झाल्याने महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरला आहे.

आ. राधाकृष्ण विखे पाटील (MLA Radhakrishna Vikhe Patil) यांच्या पुढाकारातून पद्मश्री विखे कारखान्याने (Padma Shri Vikhe factory) पिंपरी निर्मळ (Pimpari Nirmal) गावच्या जीवन प्राधीकरणाच्या पाणीपुरवठा योजनेची (Jeevan Pradhikaran water supply scheme) आवश्यक लोकवर्गणी भरल्याने या कागदावर असलेल्या साडेपाच कोटी किमतीच्या योजनेला नवसंजीवनी मिळून मूर्त रूप आले. सहा हजारांच्या पुढे लोकसंख्या असलेल्या व जिरायत टापूतील गाव असल्याने नागरिकांना कायमच पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. मात्र ही पाणी योजना कार्यान्वित झाल्याने गेल्या आठ-दहा वर्षांपासून गाव टँकरमुक्त (Village Tanker Free) झाले आहे.

आ. राधाकृष्ण विखे पाटील (MLA Radhakrishna Vikhe Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही वर्षात सरपंच डॉ. मधुकर निर्मळ (Sarpanch Dr. Madhukar Nirmal) यांनी ही योजना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावठाणसह वाडीवस्तीवर पोहचविली आहे. वेळोवेळी तात्कालीन जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे (Shalini Vikhe) यांनीही वाढीव पाईपलाईन, वितरण व्यवस्थेसाठी वस्त्यावरील पाण्याच्या टाक्या यांच्यासाठी जिल्हा परिषदेतून निधी उपलब्ध करून दिल्यामुळे योजनेची जवळपास चाळीस किमी अंतराची वितरण व्यवस्थेची पाईपलाईन पूर्ण झाली आहे.

या योजनेवर जवळपास सातशे कनेक्शन असून गावाला दर तिसर्‍या दिवशी पाणीपुरवठा (Water supply) केला जातो. शुद्ध व पुरेसा पाणीपुरवठा (Water supply) होत असल्यामुळे ग्रामस्थांमधून विशेषतः महिलांमधून समाधान व्यक्त होत आहे. योजनेचा वाढता खर्च व मिळणारे उत्पन्न पाहता मध्यतरी ग्रांमसभेने ठराव करून पाणीपट्टी दोन हजार प्रतिवर्ष केली होती. मात्र ओला दुष्काळ व करोना संकटामुळे ग्रामपंचायतीने ही करवाढ स्थगित केली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com