पिंपरी निर्मळमध्ये एकाच रात्री तीन पाणबुडी मोटारींची चोरी

पिंपरी निर्मळमध्ये एकाच रात्री 
तीन पाणबुडी मोटारींची चोरी

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ मध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून एकाच रात्री 3 पाणबुडी मोटारीची चोरी झाली आहे.

येथील बाह्यवळण रस्त्याला असलेल्या म्हसोबा मळा शिवारात राहणार्‍या विलास घोरपडे, बबन मुरादे, सुभाष मुरादे यांच्या विहिरीतील पाच एचपीच्या विविध कंपन्यांच्या 3 पाणबुडी मोटारींची बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे. त्यामुळे या शेतकर्‍यांना जवळपास पन्नास हजारांचा आर्थिक फटका बसला आहे.

आधीच अतिवृष्टीने खरिपाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. रब्बीची पिके उभी करण्याच्या सुमारास इलेक्ट्रीक मोटारीची चोरी झाल्याने शेतकर्‍यांपुढे नवे संकट उभे राहिले आहे. सोयाबीन चोरीनंतर चोरट्यांनी पाणबुडी मोटारीच्या चोरीकडे मोर्चा वळविला आहे. लोणी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून या चोर्‍यांचा तपास व्हावा व चोरट्यांवर वचक बसवावा, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांमधून होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com