पिंपरी निर्मळ येथे 3 लाखांच्या डाळिंबाची चोरी

पिंपरी निर्मळ येथे 3 लाखांच्या डाळिंबाची चोरी

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

राहाता तालुक्यातील पिंपरी येथील राहाता-शिर्डी बायपासला गावठाण लगतच्या रावसाहेब घोरपडे या शेतकर्‍याच्या दोन एकर शेतातून झाडावरील तयार झालेली डाळिंबाची फळे मंगळवारी रात्री चोरट्यांनी चोरून नेली आहेत. त्यामुळे त्यांचे जवळपास तीन लाखांचे नुकसान झाले आहे.

महिनाभरातील ही दुसरी डाळिंब चोरी असल्याने शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या बाजारात डाळिंबाची आवक कमी असल्याने डाळिंबाचे भाव तेजीत आहेत. किलो मागे 100 च्या पुढे भाव मिळत आहेत. चोरट्यांनी या डाळिंबाच्या उभ्या बागेवर डल्ला मारून मोठमोठे डाळिंब चोरून नेले आहेत. त्यामुळे घोरपडे यांचे तीन लाखांच्यावर नुकसान झालेले आहे.

गेल्या महिन्यातही गावातील बाळासाहेब पवार यांच्या शेतातून डाळिंबाची चोरी झाली होती. त्या चोरीचा तपास अद्याप गुलदस्त्यात असतानाच दुसरी चोरी झाल्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लोणी पोलिसांनी तातडीने संबंधित चोरट्यांचा तपास लावावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com