पिंपरी निर्मळमध्ये डेंग्यूचा उद्रेक; प्रशासन बेफिकीर

पिंपरी निर्मळमध्ये डेंग्यूचा उद्रेक; प्रशासन बेफिकीर

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ मध्ये डेंग्यूने थैमान घातले असून येथील लोणी रोडच्या घोरपडे वस्तीसह गावातील विविध भागात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. अनेक खासगी दवाखान्यात डेंग्यूचे रुग्ण दाखल आहेत. यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. आरोग्य प्रशासन मात्र बेफिकीर आहे.

गावात गेल्या पंधरा दिवसापासून डेग्युंचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. थंडी वाजून खूप ताप येणे, तीव्र डोकेदुखी, स्नायुदुखी, सांधेदुखी, प्लेटलेट कमी होणे आदीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. उपचारासाठी खासगी रुग्णालयात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. सरकारी आरोग्य यंत्रणा मात्र नावापुरतेच काम करताना दिसत आहे.

येथील लोणी रोडच्या डॉ. संतोष घोरपडे, बाबुराव घोरपडे, अनिल घोरपडे यांच्या वस्तीवर जवळपास दोन डझन रुग्ण सापडले आहे. या आजाराचा खर्चही मोठा असल्याने व खासगीत उपचार घ्यावे लागत असल्याने ग्रामस्थ वैतागले आहेत. ऐन कामाच्या दिवसात घरातील सर्वच मंडळी आजारी पडत असल्याने नागरिकांचे दुहेरी नुकसान होत आहे. डेंग्यूचे आक्रमण रोखण्यासाठी गावात आरोग्य विभागाने ठोस कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com