पिंपरी निर्मळमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस

शेतीचे प्रचंड नुकसान; सरसकट मदत द्या - निर्मळ
पिंपरी निर्मळमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस

पिंपरी निर्मळ |वार्ताहर|Pimpari Nirmal

राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ परीसरात बुधवारी रात्री ढगफुटी सदृष्य पाऊस झाला. या पावसाने खरीप पिकांचे प्रंचड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसात खराब झाल्याने शेतकरी हतबल झाला असृन शाासनाने सर्वच शेतकर्‍यांना सरसकट मदत द्यावी, अशी मागणी पिंपरी निर्मळ सेवा सोसायटीचे अध्यक्ष डॉ. विकास निर्मळ यांनी केली आहे.

राहाता तालुक्यात मागील पंधरवाड्यामध्ये अतिवृष्टी सदृष पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले होते. पंधरा दिवसानंतर पुन्हा परतीच्या पावसाने शेतकर्‍यांचा पिच्छा पुरवला आहे. बुधवारी रात्री पिंपरी निर्मळ परिसरात दुसर्‍यांदा ढगफुटी सदृष्य पाऊस झाला. यामुळे खरीपाच्या सोयाबीन, बाजरी, मका आदी पिकांची सोंगणी सुरू होती. रात्री अचानक पावसाचा जोर वाढला. जवळपास 70 मि.मि एवढा प्रंचड पाऊस झाल्याने या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

बँका सोसायट्यांचे कर्ज घेवून शेतकर्‍यांनी पिके उभी केली होती. मात्र अतिवृष्टीने या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. बहुतांश पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. दुसर्‍यांदा अतिवृष्टी झाल्याने उरली सुरली पिकेही वाया गेल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. शेतकरी वर्गाला दिलासा देणे आवश्यक असल्याने शाासनाने सर्वच शेतकर्‍यांना सरसकट मदत व पिक विमे द्यावेत, अशी मागणी पिंपरी निर्मळ सेवा सोसायटीचे अध्यक्ष डॉ. विकास निर्मळ यांनी केली आहे.

बुधवारी रात्रभर चाललेल्या पावसामुळे गावातील सर्व तळे ओढे नाले ओव्हरफ्लो झाले. अचानक पाणी वाढल्याने अनेक शेतकर्‍यांच्या तयार सोयाबीन शेतात जमा केलेले गंज पाण्याखाली गेले.अस्तगाव रोड, आडगाव रोड, गोगलगाव रोड सह बाह्यवळण रस्ताही पाण्याखाली गेल्याने शेतकरी व ग्रामस्थांचे प्रचंड हाल झाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com