
पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal
राहाता (Rahata) शिर्डी शहरांमधील (Shirdi) जड वाहतुक कमी करण्यासाठी पिंपरी निर्मळ (Pimpari Nirmal) येथुन बाहयवळण रस्त्याचे (Bypass Road) काम करण्यात आले. मात्र या चौकात दिशादर्शक फलक (Directional Board) नसल्याने जड वाहणांबरोबर अनेक लहाण प्रवासी वाहनेही याच रस्त्यांने चुकुण जात आहेत. निम्म्या रस्त्यांच्या पुढे गेल्यावर चुक लक्षात येते त्यावेळी मागे फिरणे किंवा सावळीवरून पुन्हा मागे यावे लागत असल्याने या प्रवाशांना हकनाक त्रास सहन करावा लागत असल्याने या चौकात दिशादर्शक फलक टाकावेत अशी मागणी होत आहे.
जागतिक बँक प्रकल्पाच्या माध्यमातुन राहाता शिर्डी शहरांमधील जड वाहतुक कमी करण्यासाठी नगर कोपरगाव महामार्गावर (Nagar Kopargav Highway) पिंपरी निर्मळ येथुन 25 किमीच्या बाहयवळण रस्त्याचे काम करण्यात आले. यासाठी मोठया प्रमाणात निधीही खर्च करण्यात आला आहे. मात्र चौकात दिशा दर्शक फलक नसल्याने शिर्डीकडे (Shirdi) जाणारे अनेक भाविक आपल्या छोट्या वाहनामधुन या बाहयवळण रस्त्यानेच पुढे जातात. तर शिर्डीकडुन (Shirdi) येणारी बरीच वहाने बाभळेश्वर (Babhaleshwar) चौक समजुन या रस्त्यानेच पुढे जातात.
पिंपरी निर्मळ (Pimpari Nirmal) गावात चौकापासुन बर्याच अंतरावर बाभळेश्वरच्या (Babhaleshwar) बाजुला एक बोर्ड आहे. अंतर जास्त असल्याने वाहनधारकांना याचा फायदा होत नाही. मात्र या चौकात अशाच पध्दतीचा स्पष्ट दिसेल असा फलक लावल्यास प्रवांशाना याचा फायदा होईल. त्यामुळे या चौकात दिशादर्शक फलक टाकावा अशी मागणी होत आहे.