पिंपरी निर्मळ बाह्यवळण चौकात बॅरिगेट व विजेच्या दिव्यांची गरज

पिंपरी निर्मळ बाह्यवळण चौकात बॅरिगेट व विजेच्या दिव्यांची गरज

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील बाह्यवळण रस्त्याकडे वळणारी चौफुली अपघाताला निमंत्रण देणारी ठरत आहे. अपुरे व मोड़के बॅरिगेट, त्यावर रेडीयम नाही. तसेच रात्री चौकात अंधार असल्याने अपघात घडत असून बांधकाम विभागाने तातडीने या बाबीची दखल घ्यावी, अशी मागणी सचिन घोरपडे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. राहाता शिर्डी शहरांवरील जड वाहतुकीचा ताण कमी व्हावा यासाठी पिंपरी निर्मळ येथून बाह्यवळण रस्ता सुरू करण्यात आला. माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून या रस्त्याला मोठा निधी मिळून रस्त्याचे कामही दर्जेदार पूर्ण झाले आहे.

हा रस्ता वाहतुकीसाठी खुलाही करण्यात आला आहे. मात्र या चौकात वाहतूक व्यवस्था अपुरी व तुटपुंजी असल्याने अनेक अपघात घडत आहे. यामध्ये अपुर्‍या प्रमाणात असलेले चौकातील बॅरिकेट मोठ्या प्रमाणात तुटले आहे. त्यावर रेडीयम नसल्याने रात्री ते चमकत नाही. तसेच चौकातील हायमॅक्स गेल्या कित्त्येक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे येथे अनेक अपघात घडत आहेत. काही दिवसापूर्वी येथील चौकात रंगनाथ घोरपडे यांचेही अशाच अपघातामध्ये निधन झाले होते.बाह्यवळण रस्ता जड वाहतुकीसाठी आहे.

चौकात दिशादर्शक फलक नसल्याने शिर्डीला जाणारे अनेक साईभक्त या बाह्यवळण मार्गे जातात व त्यांची फसगत होते. त्यामुळे या चौकात इतर बाबीबरोबर दिशादर्शक फलक लावावा. बांधकाम विभागाने तातडीने या बाबीची दखल घ्यावी व चौकात आवश्यक अशी यंत्रणा उभारावी, अशी मागणी सचिन घोरपडे व ग्रामस्थांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com