पारनेर : पिंपरी जलसेन गावचे सुपुत्र भरत कदम शहीद
सार्वमत

पारनेर : पिंपरी जलसेन गावचे सुपुत्र भरत कदम शहीद

Arvind Arkhade

पारनेर |तालुका वार्ताहार| Parner

तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील भूदल सेवेत आसाम मधील तेजपुर येथे सेवा बजावत असणारे भरत लक्ष्मण कदम हे सकाळी दैनंदिन कवायत करत असताना हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.

भरत कदम हे 2003 पासून देशसेवेचे व्रत हाती घेऊन आर्मीमध्ये सेवा बजावत होते. ते सध्या आसाम येथे नायक पदावर कार्यरत होते. शुक्रवारी सकाळी दैनंदिन कवायत करत असताना अचानक भरत यांच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर त्यांना जवळच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये व नंतर दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये नेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचा अंत्यविधी रविवारी सकाळी 11:30 वाजता पिंपरी जलसेन येथे त्यांच्या मूळ गावी होणार आहे.

भरत हे दोन वर्षानंतर निवृत्त होणार होते. ते सध्या नायक या पदावर कार्यरत होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी, भाऊ, आई-वडील आहे. आई-वडील शेती करतात, ते आजच दि. 8 रोजी गावी सुट्टीवर येणार होते. त्यांची रजा पण मंजूर झाली होती.

मुलीच्या वाढदिवसाची इच्छा राहिली अधुरी

नायक भरत कदम हे त्यांच्या 1 वर्षाच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त 2 दिवसात सुट्टीवर गावी येणार होते. त्यांच्या मुलीचा वाढदिवस 28ऑगस्टला आहे. मुलगी झाल्यामुळे ते आनंदात होते. सुट्टीवर येण्यापूर्वी झालेल्या दैनंदिन कवायती दरम्यान छातीत दुखू लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. मुलीच्या पहिल्याच वाढदिवसाला येण्याची त्यांची खूप दिवसांची इच्छा शेवटी अधुरीच राहिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com