पिंपळगावच्या ग्रामस्थांचा पाथर्डीत घंटानाद

चिंचपूर - जोगेवाडी रस्ता कामाच्या चौकशीची मागणी
पिंपळगावच्या ग्रामस्थांचा पाथर्डीत घंटानाद

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी|Pathardi

तालुक्यातील चिंचपूर इजदे ते जोगेवाडी या रस्त्याचे काम दोन महिन्यापूर्वी झाले असून निकृष्ठ कामामुळे रस्त्यावर ठीक ठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्याचे झालेले काम दर्जाहीन असून या कामाची क्वालिटी कंट्रोल मार्फत चौकशी करण्याची मागणी पिंपळगाव टप्पा येथील ग्रामस्थांनी करून पाथर्डी येथील सावर्जनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांच्या कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करत अधिकार्‍यांचा निषेध व्यक्त केला.

आंदोलनात पिंपळगाव टप्पाचे ग्रामस्थ संपत दराडे, विजय शिरसाट, नितीन शिरसाट, नारायण शिरसाट, रामदास शिरसाट, राजेंद्र शिरसाट, गणेश शिरसाट, अक्षय शिरसाट, संपत शिरसाट, नवनाथ वाघमारे, दीपक शिरसाट, उद्धव शिरसाट, विठ्ठल शिरसाट, रमेश शिरसाट, राजू निंबाळकर आदी सहभागी झाले होते.

यावेळी ग्रामस्थ म्हणाले, इतके निकृष्ट काम संबंधित ठेकेदारांकडून होत असताना आजपर्यंत सार्वजनिक बांधकाम किंवा इतर कोणत्याही विभागाकडुन कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली नाही. ठेकेदाराला पाठीशी घालत सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही कारवाई ठेकेदारावर केली नाही. कोणत्याही राजकीय पुढार्‍याने या कामावर लक्ष दिले नाही. या कामाची चौकशी झाली नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला आहे.

10 ऑक्टोबर पर्यंत रस्त्यावरील खड्डे डांबराने भरुन रस्ता सुस्थितीत केला जाईल. मुरुमाने खड्डे भरुन रस्ता तात्पुरता दुरुस्त करण्यात येईल, असे लेखी आश्वासन बांधकाम विभागाकडून आंदोलकांना देण्यात आले. यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com