पिंपळगावखांड ओव्हरफ्लो, पाणी मुळाच्या दिशेने

पिंपळगावखांड ओव्हरफ्लो, पाणी मुळाच्या दिशेने

वाकी तलाव निम्मा भरण्याच्या मार्गावर

कोतूळ, भंडारदरा |वार्ताहर| Kotul Bhandardara

उत्तर नगर जिल्ह्याचे जीवनदायिनी असलेल्या मुळा (Mula) आणि भंडारदरा (Bhandardara) पाणलोटात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. मुळा पाणलोटातील हरिश्चंद्र गड, आंबितमध्ये अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्याने मुळा नदीवर पाणी वाढल्याने आंबित (Ambit) पाठोपाठ 600 दलघफू क्षमतेचे पिंपळगाव खांड धरणही (Pimpalgav Khand Dam) ओव्हरफ्लो झाले असून आता पाणी मुळा धरणाच्या दिशेने झेपावले आहे.

दहा दिवसांपूर्वी मुळा पाणलोटात (Mula watershed) जोरदार पाऊस झाल्याने आंबित धरण (Ambi Dam) भरले होते. त्यानंतर पिंपळगाव खांड (Pimpalgav Khand) धरणात पाण्याची आवक होत होती. हे धरण ओव्हरफ्लोच्या मार्गावर असतानाच, पाऊस गायब झाला. पण काल सकाळपासूनच पाणलोटात पावसाच्या सरी जोरदार कोसळू लागल्याने 800 क्युसेकने पाणी या धरणात दाखल झाले होते. रात्री 9.15 वाजण्याच्या सुमारास हे धरण ओव्हरफ्लो झाले. आता या धरणाच्या खाली मुळा नदी (Mula River) वाहती झाली असून पावसाचे प्रमाण टिकून राहिल्यास एक दोन दिवसांत मुळा धरणात हे पाणी दाखल होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भंडारदरा पाणलोटात (Bhandardara watershed) पावसाची रिमझीम सुरू आहे. भंडारदरात धिम्या गतीने नवीन पाण्याची आवक होत आहे. काल सकाळी या धरणातील पाणीसाठा 5299 दलघफू होता. 840 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. या धरणाजवळील 102 दलघफू क्षमतेचा तलावातील पाणीसाठा आज निम्मा होण्याची शक्यता आहे. काल सकाळी या तलावातील पाणीसाठा (Water Storage) 54.11 दलघफू (48.3 टक्के) होता.

काल सकाळी 24 तासांत पडलेला पाऊस असा- (मिमी) भंडारदरा 11, घाटघर 28, पांजरे 19, रतनवाडी 21, वाकी 7.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com