पिंपळगाव देपा येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोघे भाऊ जखमी

पिंपळगाव देपा येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोघे भाऊ जखमी

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

शेतामध्ये काम करत असणार्‍या शेतकर्‍यावर दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला (Leopard Attack) करुन दोघा भावांना जखमी (Injured) केले आहे. ही घटना तालुक्यातील पिंपळगाव देपा (Pimpalgav Depa) येथे उंडे वस्तीवर गुरुवारी घडली.

पिंपळगाव देपा येथील उंडे वस्तीवर राहणार्‍या दत्तात्रय उंडे आणि मनोहर उंडे यांचे घराजवळच शेत आहे. दत्तात्रय उंडे हे शेतात काम करत होते. त्यावेळी दबा धरुन बसलेल्या बिबट्याने उंडे यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी उंडे यांनी आरडाओरड केला. आवाज ऐकून मनोहर उंडे हे शेतातील आवाजाच्या दिशेने धावले. त्यांच्यावर देखील बिबट्याने हल्ला केला. त्यांच्या पाठीवर बिबट्याने पंजा मारला आहे.

आरडाओरड झाल्याने बिबट्याने धुम ठोकली. पण सायंकाळी पुन्हा बिबट्या आला. त्याने दत्तात्रय उंडे यांच्यावर हल्ला केला. त्यांच्यावर घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात (rural hospital) औषधोपचार करण्यात आले.

बिबट्याच्या दहशतीने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने सदर परिसरात त्वरीत पिंजरा लावावा, अशी मागणी गोरख उंडे, शिवाजी शिंदे, मगन गुंड, सचिन गुंड, नितीन गुंड, शाम काळे, तुकाराम उंडे, प्रभाकर गुंड आदिंनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com