पिंपळगाव माळवी तलावात बोटींग सुरू होणार!

महापौर शेंडगे यांची माहिती: मनपाकडून जलपूजन
पिंपळगाव माळवी तलावात बोटींग सुरू होणार!

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पिंपळगाव माळवी (Pimpalgaon Malvi) तलाव (Pond) सलग दुसर्‍या वर्षी भरल्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नगर शहराचा वाढता विस्तार पाहता नागरिकांना मनोरंजनासाठी (Entertainment) महापालिकेच्या (Ahmednagar Municipal Corporation) उत्पन्नाच्या दृष्टिने येथे बोटींग (Boating) सुरू करण्यात येणार असून त्यासाठी वेगवेगळ्या एजन्सी नियुक्त करण्यासाठी लवकरच निविदा काढण्यात येतील, अशी माहिती महापौर रोहिणी शेंडगे (Mayor Rohini Shendge) यांनी दिली.

महानगरपालिकेच्या (Ahmednagar Municipal Corporation) मालकीची 700 एकर जागा असलेल्या पिंपळगाव माळवी तलाव (Pimpalgaon Malvi Pond) येथील पाण्याचे जलपूजन महापौर शेंडगे (Mayor Rohini Shendge) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी शहर प्रमुख संभाजी कदम, माजी उपमहापौर अनिल बोरूडे, संजय शेंडगे, नगरसेवक गणेश कवडे, सचिन शिंदे, शाम नळकांडे, संतोष गेणाप्पा, सरपंच राधिका प्रभुणे आदी उपस्थित होते. नागरिकांना तलाव परिसरात बसण्यासाठी चांगली बाकडे बसविण्यात येतील.

तलाव (Pond) भरल्यानंतर सांडेवरून वाहणारे पाणी दगडी फरशीवर वाहून खाली जाते, जास्त पाऊस झाल्यावर रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात (Accident) होतात त्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला रिलींग बसविण्यात येईल. तलावाच्या (Pond) चारही बाजूने लोखंडी माहिती फलक बोर्ड बसविणे बाबत सांगितले. त्यामुळे पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांना तलाव परिसराची माहिती मिळेल, असेही महापौर शेंडगे (Mayor Rohini Shendge) यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com