
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता तालुक्यातील पिंपळस येथील साईराज विजय घोगळ हा 17 वर्षीय महाविद्यालयीन तरुण बेपत्ता झाला आहे.
साईराज घोगळ हा कोपरगाव येथे कॉलेजला जातो असे सांगुन 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता घरातुन बाहेर पडला. 5 वाजेनंतर साईराजच्या कॉलेजवरुन घरी परतला नसल्याने त्याच्या आजींने साईराज कॉलेजवरुन घरी आला नसल्याचे त्याच्या वडिलांना सांगितले. त्यावेळी विजय घोगळ यांनी साईराजच्या मोबाईलवर कॉल केला. परंतु मोबाईल बंद होता. त्यामुळे त्यांनी पिंपळस येथे घरी येवुन व नातेवाईकांकडे, मित्रांकडे चौकशी केली. मात्र तो मिळुन आला नाही. कुणीतरी अज्ञात इसमाने त्याला पळवून नेले आहे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
याप्रकरणी विजय इंद्रभान घोगळ (रा. सावता डेअरी शेजारी, पिंपळस) यांच्या फिर्यादीवरुन राहाता पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर कलम 363 प्रमाणे पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास राहाता पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल डी. डी. तुपे हे करत आहेत. साईराजची उंची 5.5 फुट इतकी आहे. रंग गोरा, शरिराने सडपातळ, अंगात कॉलेजचा निळसर रंगाचा ब्लेझर, पांढरे रंगाचा शर्ट, काळे रंगाची फुल पँन्ट, पायात बुट, मराठी हिंदी भाषा बोलतो. असे त्याचे वर्णन आहे.