पिंपळसचा तो बेपत्ता युवक मुंबईत सापडला

पिंपळसचा तो बेपत्ता युवक मुंबईत सापडला

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यातील पिंपळस येथील बेपत्ता महाविद्यालयीन युवक मुंबई येथे मिळून आला आहे. पिंपळस येथील 17 वर्षीय साईराज विजय घोगळ हा युवक कोपरगाव येथे महाविद्यालयात शिक्षण घेतो. तो घरी न परतल्याने राहाता पोलीस ठाण्यात त्याचे वडील विजय घोगळ यांनी 22 फेब्रुवारी रोजी फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 85/22 भादवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. याबाबत साईराजचे कुटुंबिय तसेच नातेवाईकांना शोध घेतला पण तो आढळून आला नाही.

साईराज बेपत्ता झाल्यानंतर तो शिर्डी येथून बसने मुंबईला गेला होता. अभ्यासाच्या तणावामुळे त्यांने हा निर्णय घेतला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. मुंबईत गिरगाव चौपाटी येथे साईराज फिरत असताना पोलिसांनी त्यास विचारणा केली. त्याने राहाता तालुक्यातील पिंपळस येथील रहिवाशी असल्याचे सांगितले. डी. बी. मार्ग पोलिसांनी राहाता पोलिसांना याबाबत खात्री करण्यासाठी फोन केला. त्यावेळी राहाता पोलीस ठाण्यात हरवल्याचा गुन्हा दाखल असल्याचे सांगितल्याने त्याला पोलिस ठाण्यात बसवून ठेवून पोलीस व त्याच्या कुटुंबियांना मुंबईच्या डी. बी. मार्ग पोलिसांनी बोलावले.

राहाता पोलीस ठाण्याचे पोलिस हेड कॉन्स्टेबल दिलीप तुपे, साईराजचे वडील विजय घोगळ, पिंपळसचे सरपंच दत्तात्रय घोगळ व अन्य एक जण असे मुंबईला रातोरात पोहचले. त्यांनी साईराजला कायदेशीर पूर्तता करून मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेतले. साईराज मिळाल्यानंतर घोगळ कुटुंबियांनी पोलिसांना धन्यवाद दिले.

दरम्यान वाढत्या अभ्यासाच्या तणावामुळे शाळकरी मुले पळून जाण्याचा प्रमाण वाढले असल्याने पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. राहाता येथून बेपत्ता झालेला दुसरा युवक ओम देशमुख (वय 17) अजूनही बेपत्ता आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com