पिकअप चोरणारे दोघे सराईत जामखेड पोलीसांकडून जेरबंद

पिकअप चोरणारे दोघे सराईत जामखेड पोलीसांकडून जेरबंद

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

उस्मानाबाद जिल्ह्यात पिकअपची चोरी करून पळालेले चोरटे जामखेड पोलीसांनी शिताफिने जेरबंद केले. अतुल विक्रम वाघमारे (रा.शिवाजीनगर,बीड ) व आसाफ दस्तगीर शेख (रा.रोहतवाडी, ता.पाटोदा जि.बीड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे ओहत. भूम तालुक्यातील ज्योतिबाचीवाडी येथील शेतकरी भीमा अमृता भगत यांचा महिंद्रा बोलेरो पिकअप अज्ञात चोरट्याने 17 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री चोरून नेला होता.

त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. दरम्यान वाशी पोलीस स्टेशनच्या अधिकार्‍यांनी जामखेड पोलीसांना चोरी गेलेला पिकअप जामखेड तालुक्यात येत असल्याची माहिती दिली. सपोनि बडे यांनी पेट्रोलिंग करणारे पोलीस अंमलदार पोलीस नाईक अविनाश ढेरे, पोलीस कॉ.विजय कोळी, आबासाहेब आवारे यांना तात्काळ माहिती दिली.

या माहितीवरून जामखेड पोलीस स्टेशन हद्दीतील जामखेड ते सौताडा रोडने पिकअपचा पाठलाग करून साकत फाटा, जामखेड येथे गाडी आडवी लावुन पिकअप व दोन चोरट्याना जागेवर पकडले. हे दोघे सराईत चोरटे असून त्यांच्यावर अहमदनगरसह, बीड, औरंगाबाद, सातारा, लातूर या जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com