पिचडगाव येथून 7 शेळ्या व एका बोकडाची चोरी

पिचडगाव येथून 7 शेळ्या व एका बोकडाची चोरी

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा (Newasa) तालुक्यातील पिचडगाव (Pichadgav) येथून 7 शेळ्या (Goats) व एक बोकड (Buck) अज्ञात चोरट्यांनी (Theft) रात्री चोरुन नेल्याची घटना घडली असून याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात (Newasa Police Station) गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.

याबाबत भाऊसाहेब दत्तू बनसोडे (वय 32) धंदा-मजुरी रा. पिचडगाव ता. नेवासा यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, शुक्रवारी रात्री ते शनिवारी पहाटे या दरम्यान त्यांच्या 7 शेळ्या व एक बोकड अज्ञात चोरट्याने स्वतःच्या फायद्याकरीता फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरुन नेल्या.

या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्र. 1034/2022 भारतीय दंड विधान कलम 379 प्रमाणे 34 हजार रुपये किंमतीच्या शेळ्या व बोकड चोरी झाल्याचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक सुहास गायकवाड करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com