पोलीस निरीक्षक विजय करे यांच्यावर कारवाई करा; मनसेची मागणी

31 ऑगस्टला मुंबईत घंटानाद आंदोलनाचा इशारा
पोलीस निरीक्षक विजय करे यांच्यावर कारवाई करा; मनसेची मागणी

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवाशाचे पोलीस निरीक्षक विजय करे नेवासा तालुक्यात दोन धर्मियांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला असल्याचा आरोप मनसेने केला असून याबाबत जिल्हा सचिव विलासराव देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविले आहे. पोलीस निरीक्षक विजय करे यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा कार्यकर्त्यांसह आपल्या मुंबईतील सरकारी निवासस्थानाबाहेर 31 ऑगस्ट रोजी घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.

निवेदनात म्हटले की, पोलीस निरीक्षक विजय करे दोन धर्मियांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वतःच्या फायद्यासाठी जाती-धर्मात तेढ निर्माण करुन कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यास कारणीभूत आहेत. पोलीस निरीक्षक विजय करे यांचे वाळू तस्करांशी झालेल्या संभाषणाच्या क्लिप प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करावी. या क्लिपमुळे विजय करे राज्यात बदनाम ठरलेले असताना त्यांना पुन्हा नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या नेमणूक प्रकरणाची खातेनिहाय चौकशी करावी अशी मागणीही या निवेदनात मनसेचे जिल्हा सचिव विलासराव देशमुख यांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com