फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांनी दोन दिवसात नावे नोंदवा - पो. नि. साळवे

आरोपी मुथ्थाकडून दोन कोटीची मालमत्ता हस्तगत ; 50 हजाराची रोकड
फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांनी दोन दिवसात नावे नोंदवा - पो. नि. साळवे

माळवाडगांव |वार्ताहर| Malvadgav

मुथ्था शेतकरी लुट प्रकरणात सर्व आरोपींना अटक केल्यानंतर गुन्ह्यातील रकमेची व्याप्ती वाढत असून आपल्या भुसार मालाचे

पैसे अडकलेल्या शेतकर्‍यांनी आपले नावाचा समावेश करण्याचे राहून गेले असेल तर अशा पिडीत शेतकर्‍यांनी दोन दिवसांत पोलीस ठाण्यात येऊन नांवे दाखल करण्याचे आवाहन श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी माळवाडगांव ग्रामपंचायत सभागृहात शेतकर्‍यांचे शिष्टमंडळाचे बैठकीत बोलताना केले.

चंदन ट्रेडर्स फर्मचे चालक रमेश रामलाल मुथ्था, चंदन रमेश मुथ्था गणेश रामलाल मुथ्था यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला त्यावेळी दोन कोटी रूपयांचा समावेश होता. आरोपीना अटक होऊन 15 एप्रिलपर्यत पोलीस कोठडी मिळाल्यानंतर पोलीस ठाण्यात काटा वजन पावत्या घेऊन शेतकर्‍यांनी गर्दी केली. आपल्या कष्टाचे पैसे आता मिळणार नाही या चिंतेने ग्रासलले काही शेतकऱी अद्यापही संपर्क करत नाहीत. पोलीस कोठडी संपल्यानंतर नांवे येऊन उपयोग होणार नाही.

आतापर्यंत आरोपीकडून टाटा 407, टेम्पो, महिंद्रा पिक अप, ईक्को कार, माज्जा कार, दोन मोटारसायकल अशी वाहने ताब्यात घेण्यात आली असून अन्य वाहन, इतरत्र गुंतवणूक बाबत कुणाला माहिती असल्यास कळवावे. गणेश मुथ्थाकडील रोकड रक्कम 50 हजार हस्तगत केली आहे,

पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी शेतकर्‍यांचे शिष्टमंडळाने पहिल्या दिवसापासून पाठपुरावा करत अनेकदा पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली. पोलिसांनाही तपासकार्यात मोलाचे सहकार्य केले म्हणून आरोपींना जेरबंद करण्यास आम्हाला यश आले.

यावेळी पोलीस पाटील संजय आदिक यांनी मनोगत व्यक्त करत दोन दिवसांत तपासकामी जास्तीतजास्त सहकार्य करण्याचे शेतकर्‍यांना आवाहन केले. शेवटी लोकनियुक्त सरपंच बाबासाहेब चिडे यांनी ग्रामस्थांच्यावतीने तपासकामी सर्वोतपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन या प्रकरणाचा तातडीने तपास लावल्याबद्दल पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्यासह सहकारी पोलीस पथकाचे आभार मानले. या बैठकीस पिडीत शेतकरी शिष्टमंडळाचे सर्व कार्यकर्ते हजर होते.

मुथ्था प्रकरणात पैसे अडकलेल्या शेतकर्‍यांची यादीत नांवे द्या

मुथ्था बिल्डिंग, गोडावूनमधील वस्तू स्वत:हून जमा करण्यास पोलिसांकडून 24 तासांचा अल्टिमेट मुथ्थाकडे पैसे अडकलेल्या शेतकर्‍यांची यादीत नांवे देण्याचे आवाहन करत असताना, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी मुथ्था यांना 18 लोकांकडून (बहुतांश किराणा दुकानदार) रक्कमा घेणे आहे त्यांच्या फक्त नावाचे वाचन करत रोख अथवा चेक स्वरूपात पोलीस ठाण्यात जमा करण्यास सांगितले. मुथ्था बिल्डिंग, गोडावून तोडून अनेकांनी टप,काटा कट्टे,व दुकान घरातील टि.व्ही. फ्रीजपासून तर बाथरूम हिटर सुतळी तोड्यापर्यत ज्यांनी लुट केली. काहींनी तर आपण सफेद कॉलरआहोत असे आम्हाला भासवून . दुसर्‍यास सपोर्ट करत लुट करून घेतली अशा सर्वाचे नावाची यादी आमच्याकडे असून उद्या सायंकाळपर्यंत सामान वस्तू गुपचूप पोलीस ठाण्यात जमा कराव्यात. जमा न केल्यास यादीप्रमाणे सरसकट धरपकड करण्यात येऊन कुणाचीही गय केली जाणार नसल्याचे शेवटी साळवे यांनी सांगितले.

पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी बैठकीत सविस्तर गुन्ह्याची माहिती अन् वाहन वस्तूंचे रूपाने जास्तीतजास्त रिकव्हरी मधून शेतकर्‍याचे देणे देता येईल असे सांगत असतानाच... भुसार मालाचा दहा लाखांहून अधिक आकडा असलेले एक त्रस्त शेतकरी महोदय उठून बोलू लागले. हा तपास तर कराच परंतू पारले बिस्किटाचे रिकामे खोक्यात दोन हजार, पाचशे सर्वाधिक त्या खालोखाल शंभरच्या नोटा सोबत नेल्या होत्या. दुकानचा आत्मा असलेली बरोबर नेलेली मारवाडी खतावणी अन सोबत नेलेल्या नोटा किती कोटी आहेत? कुणाकडे ठेवल्यात? हे आरोपीकडून पोलीस कोठडीत कबुल करून घ्या ही हात जोडून विनंती.

- एक शेतकरी

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com