वादग्रस्त पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांची तडका फडकी जिल्हा मुख्यालयात बदली

निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता
वादग्रस्त पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांची तडका फडकी जिल्हा मुख्यालयात बदली

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

गेल्या दीड वर्षापासून आपल्या वागणुकीतून वादग्रस्त ठरलेले संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे (Sangamner Police Station) निरीक्षक मुकुंद देशमुख (PI Mukund Deshmukh) यांची तडका फडकी जिल्हा मुख्यालयात बदली (District Headquarters Transferred) करण्यात आली आहे. देशमुख यांच्या विरोधात संगमनेर (Sangamner) येथील विरोधकांच्या अनेक तक्रारी असल्याने त्यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई (Suspend Action Possibility) होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सुमारे दीड वर्षांपूर्वी देशमुख यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा (Sangamner Police Station) पदभार स्वीकारला होता. कडक स्वभावाचे अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जात होते. देशमुख यांचा आवेश अवघा महिन्याभरच टिकला . महिन्याभरानंतर संगमनेर शहरातील (Sangamner City) सर्व अवैध व्यवसाय (Illegal Business) जोरात सुरू झाले. सर्व बेकायदेशीर कत्तलखाने (Illegal Slaughterhouses) खुलेआम चालू झाले.

राज्यात गोहत्या बंदी कायदा अस्तित्वात असतानाही संगमनेर शहरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर कत्तलखाने सुरू आहेत. शहरातील कत्तलखाने उद्ध्वस्त करावे अशी मागणी वारंवार करूनही या कत्तलखान्यावर कारवाई करण्यात आली नाही. भिवंडी येथील प्राणी कल्याण अधिकारी यतीन जैन यांनी संगमनेरच्या कत्तलखाण्याच्या प्रश्नात लक्ष घातले. नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षकांची भेट घेऊन त्यांनी संगमनेर येथील कत्तल खाण्याची कल्पना दिली. यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षकांनी या कत्तलखान्याबाबत गंभीर दाखल घेतली.

दिनांक २ ऑक्टोबर रोजी नाशिक (Nashik) व अहमदनगर (Ahmednagar) येथील पोलीस पथकांनी संगमनेरच्या कत्तलखान्यावर (Sangamner Slaughterhouses) एकाच वेळी छापा (Raid) टाकला. या छाप्यामध्ये तब्बल एक कोटी रुपयांचे गोवंश जातीच्या जनावरांचे मांस व अनेक जिवंत जनावरे हस्तगत करण्यात आले. अलीकडच्या काळातील राज्यातील हा सर्वात मोठा छापा होता. पोलिसांच्या या कारवाईनंतर संगमनेर (Sangamner) येथील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. शहरातील सर्व कत्तलखाने उद्ध्वस्त करावे व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी भव्य मोर्चा काढला होता.

या कार्यकर्त्यांनी देशमुख यांच्याविरुद्ध ठीक ठिकाणी तक्रारी केल्या. मात्र त्यांना अभय मिळत गेले. अवैध व्यवसाय बरोबरच संगमनेर शहरात चोरीच्या प्रमाणात वाढ झाली होती. अनेक ठिकाणी चोऱ्या होत असताना शहर पोलिसांचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले होते. मटका, जुगार, गुटखा व्यवसाय संगमनेर शहरामध्ये खुलेआम सुरू आहे. या व्यवसायाविरुद्ध कारवाई करण्याऐवजी असे व्यवसाय चालवणाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर पोलीस अधिकाऱ्यांनी आर्थिक फायदा करून यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली होती. पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांवरही त्यांचा अंकुश नसल्याने गुन्हेगारांचे चांगलेच फावले होते.

संगमनेर शहर पोलीस ठाण्यात (Sangamner Police Station) खोटे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले होते. याबाबत अनेक तक्रारी करण्यात आलेले आहेत. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले यांनी वरिष्ठ पातळीवर वेळोवेळी कल्पना दिली होती. राज्यात सत्तांतर झाल्याने पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्याविरुद्ध कारवाई झाल्याचे बोलले जात आहे.

काल पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना तातडीने जिल्हा मुख्यालयात बोलावून घेण्यात आले. त्यांची बदली झाल्याने गृहखाते पुढे काय कारवाई करणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. समजलेल्या माहितीनुसार देशमुख यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com