Yoga
Yoga
सार्वमत

घरोघरी योगा...परिवारासह योगा

अहमदनगर मध्ये 15000 परिवाराकडून "घरोघरी योगा.. परिवारासह योगा" अभियान

Nilesh Jadhav

इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन अर्थात आय. एन. ओ. ने संपूर्ण देशात "घरोघरी योगा.. परिवारासह योगा" या संकल्पनेवर 21 जून 2020 चा योग दिवस साजरा करण्याचे ठरवले.

त्यांच्या बरोबरीने अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय देखील सक्रिय झाले व या अभियानात त्यांनी हिरीरीने भाग घेतला.

त्याप्रमाणे जिल्हा क्रीडा अधिकारी सौ कविता नावंदे व आय. एन. ओ. अहमदनगर शाखेने 21 जून रोजी घरोघरी व परिवारात योगा पोचविण्याचे कार्य करण्या साठी जिल्ह्याभरात पाच कॉर्डिनेटर नेमले व प्रत्येक कॉर्डिनेटर ने 20 ब्लॉक कन्वेनर बनवून त्यांच्यामार्फत सर्वांनी कमीत कमी 80 परिवाराला जोडण्याचे कार्य केले. त्या व्यतरिक्त इतर 60 आय एन सदस्यांनी देखील या अभियानात परिवार जोडण्याचे कार्य केले.

अशाप्रकारे अहमदनगर जिल्हाभरात 15000 परिवार या साखळीत जोडले गेले व लॉक डाऊन असताना देखील अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व आय. एन. ओ. अहमदनगर यांच्या विशेष अभियानाने जिल्हाभरात पन्नास हजार पेक्षा जास्त लोकांनी सकाळी साडेसहा ते आठ या वेळात फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून आपापल्या घरीच व परिवार समवेत योगासने करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

पूर्व ऑनलाइन नोंदणी केलेल्या सर्व परिवारांना इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन व आयुष मंत्रालयामार्फत लगेच ऑनलाइन सर्टिफिकेट देण्यात आले आहे.

या अभियान सफल होण्यासाठी इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन चे राष्ट्रीय चेअरमन श्री.अनंतजी बिराजदार, जिल्हा क्रीडा अधिकारी सौ. कविता नावंदे, आय. एन. ओ. उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ. प्रेरणा नाबरिया, जिल्हाध्यक्ष डॉ. यश पाटील, सचिव श्री. भरत बागरेचा, श्री. सुभाष जाधव, श्री आसाराम विलायते, सौ अचलाताई झंवर व क्रीडा कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी या सर्वांनी विशेष परिश्रम घेतले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com