Photo : नगरमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत

Photo : नगरमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत

अहमदनगर | प्रतिनिधी

करोनाचे विघ्न दूर कर, अशी प्रार्थना करत आज गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. आगमन मिरवणूकांवर बंदी असली तरी नागरिकांचा स्वागताचा उत्साह कायम होता. यानिमित्ताने शुक्रवारी सकाळपासून बाजारपेठेतील चैतन्य ओसंडून वाहत होते.

यंदाही गणेशोत्सवावर करोनाचे संकट आहे. सरकारने उत्सवासाठी नियमावली जारी केली आहे. या नियमावलीचे पालन करत गणेश मंडळे आणि घरगुती गणेशाचे स्वागत झाले. आगमन मिरवणूकांना बंदी असल्याने गणेशभक्तांनी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने आसमंत दणाणून सोडला.

भक्तांनी आपल्या दुचाकी व चारचाकी वाहनातून गणेशाची स्वागत मिरवणूक काढली. सकाळपासूनच बाजारात मूर्ती व पूजा साहित्य खरेदीसाठी गर्दी होती. आज सकाळीही बाजारपेठा फुलल्या होत्या.

यंदा गणेशमूर्ती व पूजा साहित्याच्या दरात वाढ झालेली आहे. मात्र उत्साहात कुठेही कमी नव्हती. शहरातील माळीवाडा, पाईपलाईन रोडला भिस्तबाग, प्रोफेसर कॉलनी चौक, श्रीराम चौक, एमआयडीसी भागात नागापूर परिसरात खरेदीसाठी भाविकांची गर्दी झाली होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com