PHOTO/VIDEO : धुक्यात हरवली वाट!

PHOTO/VIDEO : धुक्यात हरवली वाट!

राहाता | तालुका प्रतिनिधी

निसर्गाचा अविष्कार आज पहाट पासून सर्वांनी अनुभवला. भली पहाट धुक्यात झाकोळली होती. या दाट धुक्याने भल्यासकाळी वाहन चालकांना रस्ता दिसेना. त्या मुळे नगर मनमाड हायवे वर वाहन चालकांना मोठी कसरत करत चालावे लागले. संपूर्ण तालुक्यात हे चित्र होते.

सकाळी बहुतांशी शाळा शनिवारी सकाळी भारतात. त्यामुळे विद्यार्थी वर्गाची मोठी हाल झाली. धुके आणि थंडी असा दुहेरी अनुभव आला. वाहन चालक फॉगलॅम्प तसेच पार्किंग लाईट चालू करून वाहने हाकावी लागली.

आज सकाळी 10.30 पर्यंत धुके जाणवत होते. त्या नंतर कोवळे ऊन पडले. त्या नंतर जन जिवन सुरळीत झाले. मध्यंतरी गारपीट आणि ढगाळवातावरण त्यात आता धुक्याची भर पडली आहे.

त्यामुळे द्राक्षे, हरबरा, गहू, कांदा ही पिके धोक्यात आली आहे. धुके आणि ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. करपा, मावा, भुरी, तसेच कांदा पाथीचे शेंडे जळणे हे प्रकार याने होत आहेत. यावर उपचार म्हणून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड औषध फवारणी करण्यासाठी बसणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com