
नेवासा | Newasa
नेवासा शहर व तालुक्यात नामदार शंकरराव गडाख व उदयन गडाख यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांना त्वरित अटक करावी या मागणीसाठी तालुक्यात आयोजित बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी घटनेचा निषेध करण्यात येऊन बंद पाळण्यात आला.
पाचेगाव (वार्ताहर)
पाचेगाव येथे निषेध करण्यात येऊन गाव पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. माजी सरपंच दिगंबर नांदे माजी संचालक भागवत पवार यांनी गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली.
निंभारी
तालुक्यातील निंभारी येथे ना. गडाख समर्थक व कार्यकर्ते यांनी निषेध सभा घेऊन गावात बंद पाळला. यावेळी सरपंच पती काकासाहेब जाधव, चंद्रकांत जाधव, बाबासाहेब पवार यमाजी जाधव, जनार्दन गवळी, बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते
पुनतगाव
पुनतगाव येथे 'गाव बंद'च्या हाकेला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विठ्ठल पवार, दीपक धनगे, राजू वाघमारे, सरपंच सुदर्शन वाकचौरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चांदा (वार्ताहर)
शंकरराव गडाख समर्थक व व्यापारी असोसिएशन च्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते. सकाळी नऊ वाजता चांदा बाजारतळावर निषेध सभा घेण्यात आली. यावेळी पंचायत समिती माजी सभापती कारभारी जावळे, अनिलर्सव अडसुरे, मुळाचे संचालक बाबुराव चौधरी, उपसरपंच चांगदेव दहातोंडे, तंटामुक्ती अध्यक्ष मोहन भगत आदी उपस्थित होते.