Photo : पावसाचा तडाखा! शेवगाव-गेवराई राज्यमार्ग पाण्याखाली

वाहतूक ठप्प; प्रवाशी अडकले
Photo : पावसाचा तडाखा! शेवगाव-गेवराई राज्यमार्ग पाण्याखाली

शेवगाव | प्रतिनिधी

कालपासून उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra) आणि मराठवाड्यातील (Marathwada) अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) पडत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे तर वस्त्या, दुकानांत पाणी शिरल्याचं पहायला मिळत आहे.

पाथर्डी (Pathardi) व शेवगाव (Shevgoan) या दोन तालुक्यांच्या भागात जोरदारपणे पावसाने हजेरी लावल्याने नांदणी नदीला (Nandani river) पूर आल्याने पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव (Koradgoan), औरंगपूर (Aurangpur) व पागोरी पिंपळगाव (Pagori Pimpalgoan) येथे अनेक घरे पाण्यात गेली आहेत.

तसेच शेवगाव (Shevgoan) तालुक्यातील आखेगाव (Aakhegoan), वरुर (Varur) ,ठाकुर पिंपळगाव (Thakur Pimpalgoan) या नदीकाठावरील गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन अनेक घरे पाण्यात गेली आहेत.

बचाव पथके नसल्याने अडचण होत आहे पुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याठी स्थानिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. परंतु प्रभावी सुविधा नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. बचावकार्यासाठी नेवासा (Newasa), पैठण (Paithan) येथून बोट मागविण्यात आली असल्याचे प्रशासनकडून सांगितले जात आहे.

तर आखेगाव येथे नदीला पाणी आल्याने शेकडो घरात पाणी शिरल्याने पाण्यात आहेत वस्तीवर राहणाऱ्या बाबासाहेब पालवे यांची वस्ती पूर्ण पाण्यात गेल्याने असंख्य कुटुंब अडकले आहेत. रात्रभर घराच्या गच्चीवर भर पावसात थांबले आहेत

ठाकुर पिंपळगाव येथे ट्रकवर अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यात यश आले आहे. अनेक ठिकाणी जनावरे वाहून गेल्याच्या तक्रारी आहेत, वीज पुरवठा खंडित झाल्याने नेटवर्क व संपर्क करणे अडचणीचे ठरत आहे.

रात्री १० वाजले पासून पावसाने सुरवात केली सकाळपर्यंत कमी अधिक पाऊस सुरू आहे. सर्वत्र पाणी पाणी झाल्याने नद्या नाले दुथडी वाहू लागले आहेत

नुकसानीचे पडताळणी करून अहवाल सादर करत आहोत. परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याची माहिती शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांनी दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com