Photo : रांगोळीच्या माध्यमातून देवीची सेवा!

Photo : रांगोळीच्या माध्यमातून देवीची सेवा!

कोळपेवाडी l Kolpewadi

मानवी भावनांच्या रंग रेषामध्ये रांगोळीचे रंग भरत भावरेखा रेखाटणारे कोळपेवाडी येथील अष्टपैलू कलाकार गोरक्षनाथ चव्हाण यांनी नवरात्रीच्या निमित्ताने देवीची विविध रूपे साकारली आहेत. गोरक्षनाथ चव्हाण यांना चित्रकलेची आणि हस्तकलेची उत्तम जाण आहे. त्यामुळे उत्तम रांगोळी रेखाटण्यात त्यांचा हातखंडा आहे....

त्यांनी साकारलेली कलाकृती प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत असते. हेच त्यांच्या कलेचे वैशिष्टय म्हणावे लागेल. गोरक्षनाथ चव्हाण हे प्रत्येक सणानुसार प्रासांगिक रांगोळी रेखाटतात. आतार्पयत त्यांनी सर्व महापुरुषांची, राजकीय नेते, खेळाडू, निसर्ग चित्रण, भारतीय परंपरा लाभलेली व तिचे जतन करून ठेवलेली ग्रामीण जीवनपध्दती त्यांच्या चालरीतींचे सुंदर रेखाटन केले आहे.

या चित्रतून त्यांनी समाजप्रबोधनात्मक संदेश देण्याचे ही काम केले आहे.नवरात्री उत्सवात चव्हाण व त्यांचे कुटुंबीय हे पहिल्या दिवसापासून रांगोळी रेखाटत आहेत.दरम्यान चव्हाण यांना काही दिवसांपूर्वीच त्यांच्या उत्कृष्ट कलेमुळे राज्यस्तरीय गुरु गौरव पुरस्कार जाहिर झाला आहे.

नवरात्रीच्या नव दिवसाचे वेगवेगळे रंग असतात त्या प्रमाणे रांगोळीचा उपयोग करून देवीच्या साडीचा रंगही प्रत्येक दिवशी बदलण्यात येत आहे. कोरोना मुळे नातेवाईक, मित्रमंडळी यांना रांगोळी पाहण्यासाठी चव्हाण यांच्या घरी येता येत नाही. मात्र दुसरीकडे सोशल मिडीयावर त्यांची रांगोळी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.

Related Stories

No stories found.