
अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar
नगर शहरात रविवारी दुपारी साडेचारच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
सायंकाळी पाचच्या सुमारास शहरातील विविध भागात आणि एमआयडीसी परिसरात छोट्या स्वरूपात गारा पडल्या.
यावेळी यावेळी मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरू होता.
साधारण अर्धा तास पावसाने नगर शहराला झोडपून काढले यासह नगर दक्षिणेच्या काही तालुक्यांमध्ये पुन्हा दुसऱ्या दिवशी गारपीट झाल्याचे वृत्त आहे.