PHOTO | नगर अग्नितांडव : गडबड, गोंधळ आणि प्रचंड धावपळ...

PHOTO | नगर अग्नितांडव : गडबड, गोंधळ आणि प्रचंड धावपळ...

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

शहरातील जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या अति दक्षता विभागातील करोना कक्षाला आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली.

या आगीच्या दुर्घटनेत आणखी एकाचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ११ झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ११ जणांचा मृत्यू झाल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे.

रूग्णालयातील इतर रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे‌. याबाबतची चौकशी करण्यासाठी मुख्य अग्निशमन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिली.

या दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तर आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखाच्या मदतीची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलीय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. नातेवाईकांना धीर देत जखमी रूग्ण लवकर बरे होतील, असे त्यांनी म्हटले आहे.

तसेच या दुर्घटनेसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्राथर्ना केली आहे.

अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षास आग लागून झालेल्या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीच्या घटनेने धक्का दिला आहे. दरम्यान, या दुर्घटनेस जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र व्यवस्थेचे अक्षम्य दुर्लक्षच या घटनेस जबाबदार असल्याचा आरोप होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com