फोफसंडीत बुडालेल्या 'त्या' दोन तरुणांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश

फोफसंडीत बुडालेल्या 'त्या' दोन तरुणांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश

कोतुळ |वार्ताहर| Kotul

अकोले (Akole) तालुक्यातील फोफसंडी (Phopsondi) येथे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू (Tourists Drowned Death) झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली होती. रात्री उशिरा पर्यंत शोधूनही त्यांचा शोध न लागल्याने शनिवारी सकाळी पुन्हा शोध कार्य सुरू केले आपत्ती व्यवस्थापनाचे पथक, राजूर पोलीस स्टेशन (Rajur Police Station) तसेच पोहण्यात तरबेज असणार्‍या दोघा व्यक्तींच्या मदतीने पाण्यात बुडालेल्या दोघा तरुणाचा मृतदेह (Youth Dead Body) डोहातील कपारीतून बाहेर काढण्यात आला.

अभिजित वर्पे व पंकज पलांडे असे या मयत तरुणांची नावे आहेत. ते संगमनेर (Sangamner) तालुक्यातील कनोली येथील रहिवाशी आहेत. उत्तरीय तपासणीसाठी दोन्ही मृतदेह अकोले ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.

शुक्रवारी हे तरुण संगमनेर हुन दुचाकी वरून फोफसंडी (Phopsondi) येथे पर्यटनांसाठी गेले होते. त्यांचे सोबतइतर आणखी दोन मित्र होते. दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास हे चार पर्यटक फोफसंडी (Phopsondi) गावाजळ असणार्‍या ओढ्यावर पाणवठा धबधब्यावर (Waterfalls) थांबले होते. या ठिकाणी एक जण पाण्यात उतरून अंघोळ करत असता पाय घसरला आणि पाण्यात बुडू लागला. त्यावेळी दुसर्‍याने त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली. पण यात दोघेही बुडाले. सोबत आलेले दुसरे दोघा मित्रांनी गावात जाऊन हि माहिती गावकर्‍यांना दिली.

त्यानंतर काही गावकर्‍यांनी घटनास्थळाच्या दिशेने धाव घेतली. बुडालेल्या त्या दोघांचा शोध सुरू झाला. परंतु रात्र झाल्याने व पाऊस सुरू असल्याने उशिरा पर्यंत त्यांचा मृतदेह मिळून आला नाही.

फोफसंडी (Phopsondi) हे अकोले (Akole) तालुक्यातील अतिदुर्गम निसर्गरम्य ठिकाण असल्याने या ठिकाणी राज्यभरातून अनेक पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. सध्या अकोले तालुक्यात पाऊस पडत असल्याने निसर्गाचे सौंदर्य व आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक इकडे आकर्षित होत आहे. फोफसंडी (Phopsondi) हे गाव राज्यातील मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाते, यामुळे या भागात कायम पर्यटकांची वर्दळ असते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com