पेट्रोल देण्यास उशीर झाल्याने युवकांनी रात्रीच्यावेळी घातला राडा!

पेट्रोल देण्यास उशीर झाल्याने युवकांनी रात्रीच्यावेळी घातला राडा!

राजुरी |वार्ताहर| Rajuri

पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या काही तरुणांनी पेट्रोल देण्यास उशीर केल्याच्या कारणावरून गोंधळ घालत पेट्रोल पंपावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना मारहाण केली. याप्रकरणी या कर्मचार्‍यांनी लोणी पोलीस ठाण्यात तक्रार केली. मात्र रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नव्हती.

राहाता तालुक्यातील बाभळेश्वर ते लोणी रोडवरील एका पेट्रोल पंपावर मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पेट्रोल घेण्यासाठी आलेल्या युवकास पेट्रोल पंपावरील कर्मचार्‍याकडून पेट्रोल देण्यास उशीर झाला. या करणावरून त्या युवकांमध्ये व पेट्रोल देणार्‍या कर्मचार्‍यांमध्ये शाब्दिक चकमक होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. रात्रीच्यावेळी या झालेल्या घटनेमुळे येणार्‍या-जाणार्‍या रोडवरील नागरिकांना काय झाले याची कल्पना न आल्यामुळे थोडावेळ या परिसरात मोठा गोंधळ उडाला होता.

किरकोळ कारणावरून झालेल्या हाणामारीमध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचारी तसेच पेट्रोल घेण्यासाठी आलेल्या युवकांमध्ये असा हाणामारीचा प्रसंग प्रथमच घडला. या घटनेची माहिती काही नागरिकांनी लोणी पोलीस स्टेशनला दिल्यानंतर लोणी येथील पोलीस घटनास्थळी दाखल होऊन हा वाद रात्री सामंजस्याने मिटविण्याचा प्रयत्न करत होते. मात्र हा वाद मिटला की नाही हे मात्र समजू शकले नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com