
जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed
पेट्रोल पंप कर्मचारी झोपेत असताना पट्रोल विक्रीतून त्याच्या खिशात जमा झालेली 30 हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचा प्रकार 29 मे रोजी मध्यरात्री तालुक्यातील जमदारवाडी शिवारात घडला. या प्रकरणी मल्हारी भाऊसाहेब कोल्हे (रा. राजुरी ता. जामखेड) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार 29 मे रोजी रोजी रात्री खर्डा रोडवरील जमदारवाडी शिवारातील पेट्रोल पंपावर ते एका साथीदारासह कार्यरत होते.
काम आटोपून ते झोपले असताना मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अनोळखी चोरट्याने पेट्रोल पंपावर येऊन तीस हजार रुपये रोख रक्कम चोरून खिसा साफ केला. याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. भागवत करत आहेत.