बाटलीत पेट्रोल दिले नाही म्हणून पेट्रोल पंप कर्मचार्‍यास रॉडने मारहाण

बाटलीत पेट्रोल दिले नाही म्हणून पेट्रोल पंप कर्मचार्‍यास रॉडने मारहाण

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शहरालगत असलेल्या सावळीविहीर येथील पेट्रोल पंपावर काम करणारे कर्मचारी यांनी बाटलीमध्ये पेट्रोल दिले नाही म्हणून त्याचा राग येवून चार जणांनी लाकडी दांडक्याने व लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावळीविहिर येथील गणेश गोविंद भवर (वय 21) हा पेट्रोल पंपावर ड्युटी करत असताना तेथे संदीप रमेश विघे, सचिन रमेश विघे, विशाल अशोक आगलावे, प्रशांत पालकर, सर्व राहणार सावळीवीहीर हे आले आणि आम्हाला बाटलीमध्ये पेट्रोल दे असे म्हणू लागले. त्यावर श्री.भवर यांनी पेट्रोल फक्त अत्यावश्यक वाहनासाठी देण्याची परवानगी आहे व बाटलीमध्ये पेट्रोल देण्यास मालकाने मनाई केली आहे असे त्या चौघांना सांगितले. त्याचा राग आल्याने त्यांनी हातातील लाकडी दांड्याने व लोखंडी रॉडने भवर यांच्या हातावर, पायावर, पोटरीवर व डोक्यात मारहाण केली.

याप्रकरणी गणेश गोविंद भवर यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 107/2021 प्रमाणे संदीप रमेश विघे, सचिन रमेश विघे, विशाल अशोक आगलावे, प्रशांत पालकर, यांच्याविरुध्द भादवि कलम 324, 323,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक श्री. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार श्री. भुतांबरे हे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com