अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पेट्रोलपंपावरील जमा झालेली रक्कम घेऊन पसार झालेल्या कमगाराला नगर तालुका पोलिसांनी दोन वर्षानंतर जेरबंद केले आहे.

सोमनाथ जगन्नाथ जाधव (रा. जिकठाणा ता. गंगापूर जि. औरंगाबाद) असे अटक केलेल्या कर्मचार्याचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीचे 29 हजार 693 रूपये जप्त केले आहे.

सोमनाथ जाधव चास (ता. नगर) शिवारातील अश्विन पेट्रोलपंपावर कामाला होता. 21 मार्च 2019 रोजी जाधव याने पेट्रोलपंपावरील जमा झालेली 29 हजार रूपयाची रक्कम घेऊन पळ काढला होता. याप्रकरणी त्याच्याविरूद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

जाधव हा निंबे जळगाव (ता. गंगापूर) येथे असल्याची माहिती सहाय्यक निरीक्षक राजेंद्र सानप यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून तालुका पोलिसांच्या पथकाने जाधव याला अटक केली आहे.