पेट्रोल, डिझेलची दरवाढ त्वरित रद्द करावी

ससाणे : श्रीरामपूर काँग्रेसच्यावतीने प्रांतधिकारी व तहसीलदारांना निवेदन
पेट्रोल, डिझेलची दरवाढ त्वरित रद्द करावी

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - सध्या करोनासारख्या महामारीने जनता हैराण झाली असतानाच खरीप हंगामाच्या तोंडावर केंद्र शासनाने रासायनिक खतांच्या किमतीत आणि पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ केली असून या दरवाढीचा काँग्रेस पक्षाच्यावतीने उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी निषेध करून ही दरवाढ रद्द करण्याची मागणी केली आहे. काल काँगे्रस पक्षाच्यवतीने तहसीलदार व प्रांताधिकार्‍यांना निवेदन दिले.

निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, यंदाचा खरीप हंगाम जवळ आलेला असून त्यासाठी पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आलेला आहे. परंतु गेल्या एक वर्षापासून करोना टाळेबंदी, अवकाळी पाऊस, वादळ यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नाला व शेतमालाला मोठा फटका बसला आहे. उत्पन्न व खर्च यांचा ताळमेळ बसवताना शेतकरी वर्ग आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेला आहे. यंदाचा खरीप हंगाम जवळ आलेला असून त्यासाठी पेरणीपूर्व मशागतीसाठी ट्रॅक्टरला डिझेलची आवश्यकता असते. केंद्र शासनाने डिझेलच्या किंमतीतही भरमसाठ दरवाढ केल्याने शेती मशागतीचे दरसुद्धा वाढले आहेत.

पेट्रोलने शंभरी पार केलेली असून पेट्रोल-डिझेलची दरवाढ सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेरची झाली असून पहिल्यांदा देशाच्या इतिहासात महागाई निर्देशांक 10.49 टक्के झाला असून हा महागाईचा दर सर्वाधिक झाला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीने उपनगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, शहराध्यक्ष संजय छल्लारे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अरुण पाटील नाईक यांनी या दरवाढीचा निषेध करून ही दरवाढ त्वरित रद्द करावी, या मागणीसाठी श्रीरामपूर तहसीलदार व प्रांताधिकारी यांना निवेदन दिले.निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, रंदाचा खरीप हंगाम जवळ आलेला असून त्रासाठी पेरणीपूर्व मशागतीच्रा कामांना वेग आलेला आहे. परंतु गेल्रा एक वर्षापासून करोना टाळेबंदी, अवकाळी पाऊस, वादळ रामुळे शेतकर्‍रांच्रा उत्पन्नाला व शेतमालाला मोठा फटका बसला आहे. उत्पन्न व खर्च रांचा ताळमेळ बसवताना शेतकरी वर्ग आर्थिकदृष्ट्र्ा कमकुवत झालेला आहे.

रंदाचा खरीप हंगाम जवळ आलेला असून त्रासाठी पेरणीपूर्व मशागतीसाठी ट्रॅक्टरला डिझेलची आवश्रकता असते. केंद्र शासनाने डिझेलच्रा किंमतीतही भरमसाठ दरवाढ केल्राने शेती मशागतीचे दरसुद्धा वाढले आहेत. पेट्रोलने शंभरी पार केलेली असून पेट्रोल-डिझेलची दरवाढ सामान्र जनतेच्रा आवाक्राबाहेरची झाली असून पहिल्रांदा देशाच्रा इतिहासात महागाई निर्देशांक 10.49 टक्के झाला असून हा महागाईचा दर सर्वाधिक झाला आहे. त्रामुळे काँग्रेस पक्षाच्रा वतीने उपनगराध्रक्ष करण ससाणे, जिल्हा काँग्रेसचे कार्राध्रक्ष सचिन गुजर, शहराध्रक्ष संजर छल्लारे, तालुका काँग्रेसचे अध्रक्ष अरुण पाटील नाईक रांनी रा दरवाढीचा निषेध करून ही दरवाढ त्वरित रद्द करावी, रा मागणीसाठी श्रीरामपूर तहसीलदार व प्रांताधिकारी रांना निवेदन दिले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com