पेट्रोल-डिझेलबाबत भाजप आक्रमक

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने । राज्य सरकारने कर कमी करण्याची मागणी
पेट्रोल-डिझेलबाबत भाजप आक्रमक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबाबत (Petrol-diesel Price Hike) आता भाजपनेही आक्रमक (BJP Aggressive) भूमिका घेतली आहे. इंधनाच्या विक्रमी दरवाढीमुळे हैराण झालेल्या जनतेला थोडा दिलासा देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) ज्या प्रकारे पेट्रोल-डिझेलवरील करात कपात (Tax Reduction on Petrol-Diesel) केली, त्याप्रमाणे राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही (Mahavikas Aghadi) करात कपात करून जनतेला आणखी दिलासा द्यावा, या मागणीसाठी नगर शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्यावतीने (BJP) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करुन निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, कॅन्टों.बोर्ड उपाध्यक्ष वसंत राठोड, अ‍ॅड.विवेक नाईक, युवराज पोटे, तुषार पोटे, बाळासाहेब गायकवाड, अजय चितळे, शिवाजी दहिंडे, मनेष साठे, धनंजय जामगांवकर, प्रशांत मुथा, अमित गटणे, शशांक कुलकर्णी, सुमित बटुळे, विलास गांधी, लक्ष्मीकांत तिवारी, सुनिल पांडूळे, आदेश गायकवाड, पंकज जहागिरदार, हुजेफा शेख, ऋग्वेद गंधे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी भैय्या गंधे म्हणाले, राज्य सरकार स्वत:चे अपशय झाकण्यासाठी नेहमीच केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत. परंतु केंद्र सरकारने चांगल्या योजना राबविल्या त्यांची अंमलबजावणी राज्य सरकारने करणे अपेक्षित आहे परंतु तसे होतांना दिसत नाही. फक्त पेट्रोल-डिझेल दरवाढीचा बाऊ करुन जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न हे आघाडी सरकार करत आहे.

जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील एक्साईज कर कमी केल्याने महाराष्ट्रात पेट्रोल सहा रुपये व डिझेल बारा रुपये स्वस्त झाले. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी सातत्याने पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात आंदोलने केली होती. मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठा दिलासा दिल्यानंतर आता आघाडी सरकारनेही कर कपात करावी आपल्या वतीने अधिक मदत केली पाहिजे, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित यांना दिले.

व्हॅट अन् सवलत...

राज्यात डिझेलवर 24 टक्के व पेट्रोलवर 25 टक्के व्हॅट आकारला जातो. त्या खेरीज पेट्रोलवर प्रती लिटर नऊ रुपये सेसही आहे. यामध्ये दुष्काळासाठी लागू केलेल्या तीन रुपये प्रतिलीटर सेसचा समावेश आहे. राज्य सरकारला पेट्रोल डिझेलवर करापोटी तीस ते चाळीस रुपये प्रति लिटर मिळतात. राज्य सरकारने पेट्रोल व डिझेलवरील व्हॅट कमी करून मोदी सरकारप्रमाणेच पेट्रोलसाठी पाच रुपये तर डिझेलसाठी दहा रुपये सवलत द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com