अहमदनगर (प्रतिनिधी) -

दिवसांगणिक वाढत असलेल्या पेट्रोलने नगरमध्ये शंभरी पार केली आहे. नगरमध्ये आज पॉवर पेट्रोलचे

भाव 100 रुपये 87 पैसे इतका झाला आहे.

इंधन दरवाढीचा सिलसीला गत महिनाभरापासून कायम आहे. नगरमध्ये एक लीटर पॉवर पेट्रोलसाठी 100.87 रुपये मोजावे लागत आहे.

साध्या पेट्रोलनेही शंभरी गाठली आहे. साध्या पेट्रोलचे भाव 97.43 इतके झाले आहे. डिझेलचा भाव प्रतिलीटर 87.12 इतका आहे.