लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना धमकू नये

स्वत:हा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी रात्रंदिवस मेहनत घेत करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत आहे
लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना धमकू नये
अ‍ॅड. लगड

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

तीन ते चार महिन्यांपासून करोना महामारीचे सत्र सुरू आहे. करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. तो रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. स्वत:ह जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी रात्रंदिवस मेहनत घेत करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत आहे, अशी परीस्थीती नगर दक्षिणचे लोकप्रतिनिधींनी वेळीच लाॅकडाऊन केले नाही तर करोनाची परीस्थीती अधिक होते धोकादायक होईल, त्यास जिल्हाधिकारी द्विवेदी हेच जबाबदार असतील व एक खासदार म्हणून नव्हे तर एक डाॅक्टर म्हणुन मी हे माझे मत व्यक्त करीत आहे."असा इशारा वजा धमकी एका कार्यक्षम जिल्हाधिकारी द्विवेदी यांना नुकताच दिला. खा.डॉ. विखे आपण फार मोठी माणसं आहात. आपणास नगर जिल्हाच नव्हेतर संपुर्ण महाराष्ट्र ओळखतो. आपले जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जीवापाड मेहनत घेतलेली आहे. हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. ते करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रामाणिक पणे प्रयत्न करत आहेत. अशा आजही प्रयत्न करीत आहेत.

अशा अधिकाऱ्याविरोधात धमकीची भाषा लोकप्रतिनिधीं म्हणुन आपल्याला शोभत नाही. विनाकारण प्रसिद्धीसाठी अशी बेताल वक्तव्य करून आपण आपले हसु करून घेऊ नका. याउलट तुम्ही डॉक्टर आहात. करोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी वैद्यकीयदृष्टया काय मदत करता येईल ते सहकार्य करावे. केवळ स्वताचे बडेजावसाठी एका कार्यक्षम जिल्हाधिकारी यांना धमकावू नये असे आवाहन अ‍ॅड. सुरेश लगड यांनी केले आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com