लोक अदालतीमुळे सर्वसामान्य करदात्यांना फायदा

लोक अदालतीमुळे सर्वसामान्य करदात्यांना फायदा

पालिकेचा थकीत 30 लाख रुपये कर वसूल || मालमत्ता जप्तीच्या कारवाईपासून वाचल्याने नागरिकांमध्ये समाधान

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधिसेवा प्राधिकरण अहमदनगर व तालुका विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव नगर पालिकेत तालुका विधी सेवा समिती कोपरगाव अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश बोधनकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात आली. यात पालिकेची 30 लाखांची वसुली करण्यात आली आहे.

यावेळी सहकार न्यायाधीश ल.मु.सैय्यद, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, नगराध्यक्ष विजय वहाडणे, उपमुख्याधिकारी श्वेता शिंदे, करनिरीक्षक पल्लवी सूर्यवंशी, बांधकाम अभियंता नितेश मिरीकर व श्री. ताजवे, लेखापाल तुषार नालकर, आस्थापना प्रमुख मारिया दुसिंग,संगणक अभियंता भालचंद्र उंबरजे,सभा विभागाप्रमुख ज्ञानेश्वर चाकणे,आरोग्य विभागप्रमुख सुनिल आरण,मार्केट विभागप्रमुख राजेश गाढे व नगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कोपरगाव नगर पालिकेची घरपट्टी व नळ पट्टी अशी थकीत पट्टी 12 कोटी रुपये असून यामध्ये चालू घरपट्टी 2 कोटी 58 लाख 86 हजार 295 रुपये तर मागील थकबाकी 3 कोटी 44 लाख 66 हजार 478 असे 6 कोटी 3 लाख 52 हजार 773 रुपये थकीत आहे.तसेच चालू नळपट्टी 2 कोटी 62 लाख 74 हजार 128 रुपये असून मागील थकबाकी 3 कोटी 85 लाख 49 हजार 536 रुपये अशी ऐकून 6 कोटी 48 लाख 23 हजार 664 रुपये आहे. कोपरगाव शहरा 16 हजार 182 निवासी मालमत्ता धारक असून व्यावसायिक 6 हजार 342 मालमत्ता धारक कर दाते आहे.

नुकत्याच आयोजित राष्ट्रीय लोकअदालतिच्या माध्यमातून शहरातील 2 हजार 55 मालमत्ता धारकांना न्यायालयाची नोटीस बजावण्यात आली होती. त्यात 855 अपिलार्थी उपस्थित होते. त्यातील 600 मालमत्ता धारकांनी 29 लाख 66 हजार 827 रुपये इतकी शासकीय कर भरला असून पालिकेचे 30 लाख रुपयांची वसुली झाली आहे. या वसुलीच्या कारवाईत पालिका कार्यालयात नागरिकांच्या सोयीकरिता 7 कॅश काउंटर लावण्यात आलेली होती. तर 5 पथकांची नियुक्ती नागरिकांना माहिती देण्यासाठी व थकीत असलेल्या मालमत्ता कराचा भरणा स्वीकारण्यासाठी पालिकेच्या नियंत्रण अधिकारी आणि पथकातील कर्मचारी यांनी जबाबदारी पार पडली आहे.

कोपरगाव शहरातील नागरिकांनी पालिकेची घरपट्टी व पाणीपट्टी मोठ्या प्रमाणावर थकलेली असल्या कारणाने थकबाकीधारक करदात्यांना न्यायालयीन नोटीस काढून राष्ट्रीय लोक अदालत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. थकीत करदात्यांना दिलासा देण्यासाठी हप्ते पाडून देण्यात आले. नागरिकांना याचा फायदा झालेला आहे.

- ल.मु.सैय्यद, सहकार न्यायाधीश

सहकार न्यायाधीश ल.मु.सैय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रिय लोक आदालत पार पडली. यावेळी शहरातील नागरिकांनी पालिकेची थकलेली पाणी पट्टी व घर पट्टीचे दावे निकाली काढण्यात आले. उर्वरित थकीत रकमेचे हप्ते पाडून दिलेले आहेत. या उपक्रमांत पालिकेची मोठ्या प्रमाणावर कर वसुली झालेली आहे. याचा नागरिकांना देखील फायदा झाला आहे.

- शांताराम गोसावी मुख्याधिकारी

Related Stories

No stories found.