लोक न्यायालयात 16 हजार प्रकरणांची तडजोड

लोक न्यायालयात 16 हजार प्रकरणांची तडजोड

72 कोटी 67 लाख रूपयांची वसूली

अहमदनगर|Ahmedagar

जिल्हा न्यायालय (District Court) व सर्व तालुका न्यायालयात (Taluka Court) शनिवार, 25 सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये (National People's Court) 13 हजार 148 दाखलपूर्व प्रकरणे मिटविण्यात आली. तर दोन हजार 952 प्रलंबीत प्रकरणाचा (Pending case) निपटारा करण्यात आला. यातून 72 कोटी 67 लाख 91 हजार 594 रूपयांची वसुली करण्यात आली. 84 हजार 221 प्रकरणे या लोकन्यायालयात (People's Court) ठेवण्यात आली होती. त्यातील 16 हजार 100 प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या. रेवती देशपांडे (Secretary Justice. Revati Deshpande) यांनी दिली.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (District Legal Services Authority), अहमदनगर बार असोसिएशन व सेंट्रल बार असोसिएशन (Ahmednagar Bar Association and Central Bar Association) यांचे संयुक्त विद्यमाने शनिवारी जिल्हा न्यायालय (District Court) व सर्व तालुका न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे (National People's Court in court) आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये जिल्ह्यातील सर्व न्यायालयातील दिवाणी प्रकरणे, फौजदारी एन. आय. अ‍ॅक्ट प्रकरणे, बँकेची कर्ज वसुली प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कामगार कायद्यातील प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, वीज महावितरणची समझोता योग्य प्रकरणे तसेच न्यायालयात येण्या अगोदरचे दाखलपूर्व प्रकरणे आपसी समझोत्याकरीता ठेवण्यात आली होती.

जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयामध्ये करोना नियमांचे तंतोतंत पालन करून नागरिकांची प्रकरणे आपसामध्ये समझोता करून मिटविण्यात आली. जिल्ह्यातील सर्व न्यायालयात हे लोकन्यायालय आयोजित करण्यात आले होते. अहमदनगर येथील जिल्हा न्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष न्यायाधीश सुधाकर वें. यार्लगड्डा (Judge Sudhakar Yarlagadda) व जिल्हा न्यायाधीश-1 मिलींद कुर्तडीकर (District Judge-1 Milind Kurtadikar) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अहमदनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष भुषण बर्‍हाटे, सेंट्रल बार असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष काकडे, सरकारी वकील सतिश पाटील व विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव रेवती देशपांडे यांच्या उपस्थितीत पार पडले.

न्यायालयास आगळे-वेगळे स्वरूप

जिल्हा न्यायालयाचे प्रांगण रांगोळी व फुलांच्या माळांनी सुशोभित करण्यात आले होते. पारंपरिक न्यायालयापेक्षा आगळे वेगळे स्वरूप न्यायालयास देण्यात आले होते. बँका, महानगरपालिका यांची दाखलपूर्व प्रकरणे मिटवण्यात आली. महानगरपालिकेची करवसुली प्रकरणे यामध्ये ठेवण्यात आली होती. त्यासाठी वेगळा मंडप व पक्षकारांच्या सुविधेसाठी अनेक काउंटर ठेवण्यात आले होते. करवसुली प्रकरणांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदरचे लोकन्यायालय न्यायाधीश, वकील, पोलीस, विधी स्वयंसेवक व न्यायालयाचे कर्मचारी यांच्या सहकार्याने यशस्वीरितीने पार पडले.

Related Stories

No stories found.