24 हजार 338 प्रकरणात तडजोड

लोकन्यायालय : 55 कोटी 40 लाखांची वसूली
24 हजार 338 प्रकरणात तडजोड

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा व सर्व तालुका न्यायालयात शनिवारी आयोजित केलेल्या लोकन्यायालयात एक लाख 36 हजार 309 प्रकरणे ठेवण्यात आली होती. यापैकी 24 हजार 338 प्रकरणे तडजोडीने निकाली काढत 55 कोटी 40 लाख 94 हजार रूपयांची वसूली करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवती देशपांडे यांनी दिली.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, शहर वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 7) लोकन्यायालयाचे जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये आयोजन करण्यात आले होते. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा, न्यायाधीश मिलिंद कुर्तडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वकील संघटनेचे अध्यक्ष अनिल सरोदे, सुभाष काकडे, जिल्हा सरकारी वकिल सतीश पाटील यांच्या उपस्थितीत लोकन्यायालयाचे उद्घाटन करण्यात आले.

दिवाणी प्रकरणे, फौजदारी, बँकेची कर्ज वसुली, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई, कामगार न्यायालयांतील प्रकरणे, कौटुंबिक वाद, महावितरण तसेच न्यायालयांत येण्याअगोदरचे दाखलपूर्व प्रकरण आदींचा समावेश होता.

जिल्ह्यामध्ये 17 हजार 720 दाखलपूर्व प्रकरणे मिटविण्यात आली. त्यापैकी दोन हजार 613 प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. स्पेशल ड्राईव्ह (विशेष मोहीम) मध्ये चार हजार पाच प्रकरणे निकाली करण्यात काढण्यात आल्या. लोकन्यायालय न्यायाधीश, वकिल, पोलीस, विधी स्वयंसेवक व न्यायालयाचे कर्मचारी यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.