
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक/कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या मूळ निवृत्तीवेतनधारक/कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या एकूण रकमेवर 1 जुलै 2022 पासून महागाई वाढीचा दर 34 टक्क्यांवरून 38 टक्के सुधारित करण्याचे निर्देश वित्त विभागाने दिले आहेत. महागाई वाढ 1 जुलै 2022 पासूनच्या थकबाकीसह जानेवारी 2023 च्या निवृत्तीवेतन/कुटुंब निवृत्तीवेतनासोबत रोखीने देण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक/कुटुंब निवृत्तीवेतनधारक अद्यापही असुधारित वेतनक्षेणीत (पाचव्या वेतन आयोगानुसार) निवृत्तीवेतन/कुटुंब निवृत्तीवेतन घेत आहेत. त्यांच्या मूळ निवृत्तीवेतन/कुटुंब निवृत्तीवेतन रकमेवर 1 जुलै 2022 पासून महागाई वाढीचा दर 381 टक्क्यांवर 396 टक्के करण्यात येणार आहे. ही वाढ 1 जुलै 2023 पासूनच्या थकबाकीसह जानेवारी 2023 च्या निवृत्तीवेतन/कुटुंब निवृत्तीवेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे.
तसेच, राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक/कुटुंब निवृत्तीवेतनधारक अद्यापही असुधारित वेतनक्षेणीत (सहाव्या वेतन आयोगानुसार) निवृत्तीवेतन/कुटुंब निवृत्तीवेतन घेत आहेत. त्यांच्या मूळ निवृत्तीवेतन/कुटुंब निवृत्तीवेतन रकमेवर 1 जुलै 2022 पासून महागाई वाढीचा दर 203 टक्क्यांवर 212 टक्के करण्यात येणार आहे. ही वाढ 1 जुलै 2023 पासूनच्या थकबाकीसह जानेवारी 2023 च्या निवृत्तीवेतन/कुटुंब निवृत्तीवेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे.
ज्यांना निवृत्तीवेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी, कृषीत्तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये यामधील निवृत्तीवेतनधारक/कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना हा निर्णय योग्य त्या फेरफारसह लागू राहिल. झेडपीच्या निवृत्ती वेतनधारकांही हा निर्णय लागू राहणार आहे.