देशभर पेन्शनर बचाव आंदोलन

पेन्शन धारकांचे 24 मार्च ते 7 एप्रिल पर्यंत
देशभर पेन्शनर बचाव आंदोलन

शिरसगाव |वार्ताहार| Shirasgav

ईपीएस 95 पेन्शन धारकांच्या पेन्शनवाढीबाबत 24 मार्च पासून सात एप्रिलपर्यंत देशभर पेन्शनर बचाव आंदोलन करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर यांनी दिली.

राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन होत आहे. सीबीटी अध्यक्ष व सर्व सदस्य यांना समक्ष भेटून निवेदन व आंदोलनाची नोटीस देण्यात येणार असून याची जबाबदारी दिल्ली कलकत्ता, हैदराबाद व जळगाव येथील प्रांतीय अध्यक्ष व मुख्य समन्वयक यांचेकडे दिली आहे.

त्याचप्रमाणे आपापल्या मतदारसंघातील खासदारांना समक्ष निवेदन देऊन या अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करण्याचे विनंती करण्यासाठी जिल्ह्यातील पदाधिकारी दि. 27 मार्चला खा. डॉ. सुजय विखे पा. व खा. सदाशिव लोखंडे आदीची भेट घेणार आहे. दिल्ली येथील आंदोलनाबाबत शिर्डी येथे आगामी होणार्‍या कार्यकारिणी बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. तसेच राष्ट्रीय संघर्ष समितीची कार्यकारिणी बैठक 17 व राष्ट्रीय पेन्शनर्स अधिवेशन 18 एप्रिल रोजी शिर्डी येथे होणार असल्याचे पोखरकर यांनी सांगितले

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com