पेन्शनवाढीच्या प्रश्नासाठी दिल्लीच्या रामलीला मैदानावर पेन्शनधारकांची भव्य रॅली

पेन्शनवाढीच्या प्रश्नासाठी दिल्लीच्या रामलीला मैदानावर पेन्शनधारकांची भव्य रॅली

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

देशातील 60 लाख ईपीएस 95 पेन्शनधारकांचा पेन्शनवाढीचा प्रश्न मार्गी न लागल्याने दिल्ली येथे केंद्रीय भविष्य निधी आयुक्त कार्यालयासमोर 1 ऑगस्टपासून राष्ट्रीय संघर्ष समितीच्यावतीने राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषण सुरू आहे. देशात सर्व ठिकाणी तालुका, जिल्हा स्तरावर आंदोलन सुरू होते. दि. 7 ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण सुरू राहील, असा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर देशातील हजारो पेन्शनरांनी दि. 8 ऑगस्ट रोजी रामलीला मैदान दिल्ली येथे देशव्यापी मेळाव्याला उपस्थित राहून भव्य रॅली काढली. पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर व राज्यातील पदाधिकारी यांनी नेतृत्व केले.

यावेळी राष्ट्रीय संघर्ष समिती राष्ट्रीय अध्यक्ष राऊत यांनी सांगितले की, सरकारकडे साडेचार लाख करोड रुपये फंडात जमा आहेत. दरवर्षी त्यात 90 हजार करोड रुपये वाढ़ होत असते. तो पैसा 65 लाख पेन्शनधारकांचा आहे. आपल्या मागणीनुसार पेन्शन वाढ झाली नाही तर हा लढा पुढे चालू राहणार आहे.

पेन्शनधारकांना 7500 रुपये अधिक महागाई भत्तासह दरमहा पेन्शन मिळावी, वैद्यकीय मोफत सुविधा मिळावी, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन आहे. केंद्र सरकार इतर पेन्शन योजनांची योग्यरीतीने अंमलबजावणी करीत आहे. पण ईपीएस 95 योजनेबाबत सावत्र व्यवहार करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेबरोबर खा. हेमा मालिनी यांच्यासमवेत शिष्टमंडळाने दोन वेळा सकारात्मक चर्चा केली. प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन व तशा सूचना संबंधित खात्याला, मंत्रालयाला दिल्या तरी हा प्रश्न प्रलंबित राहिला. त्यामुळे आंदोलन करण्यात आल्याचे पश्चिम भारत संघटक सचिव सुभाष पोखरकर यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com