शिक्षण विभागात ठिय्या आंदोलन

शिक्षण विभागात ठिय्या आंदोलन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

माध्यमिक शिक्षकांच्या प्रलंबीत प्रश्नांची (Pending questions of secondary teachers) सोडवणूक होत नसल्याने अहमदनगर जिल्हा व महानगर माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने (Ahmednagar District and Metropolitan Secondary Teachers Association) जिल्हा परिषद (Zilla Parishad) मधील माध्यमिक शिक्षक विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन (Movement) करण्यात आले. वारंवार आंदोलन (Movement) करुन प्रश्न सुटत नसल्याने आंदोलकांनी जोरदार निदर्शने केली.

तर वेतन पथक कार्यालयात शिक्षक, शिक्षकेतरांची कामे पैश्याशिवाय होत नसल्याचा आरोप (Allegations) करुन भ्रष्टाचाराचा निषेध (Protest against corruption) नोंदवत आंदोलकांनी थेट शिक्षणाधिकारी यांच्या दालनात ठिय्या मांडला. यावेळी अनियमित होणारे वेतन, रखडलेले वैद्यकीय बिले (Medical bills), फरक बिले प्रश्नांबाबत असंतोष व्यक्त करण्यात आला.

माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतरांचे अनेक मागण्या शासनस्तरावर प्रलंबीत (Pending at the government level) आहे. माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतरांचे प्रश्न सुटण्यासाठी महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) (Maharashtra Secondary Teachers Association) यांच्या आदेशान्वये संपुर्ण राज्यात प्रत्येक जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन (Movement) करण्यात आले. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतरांचे वेतन वेळेत होत नसल्याने त्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच वेतन पथक कार्यालयाकडून शिक्षक, शिक्षकेतरांची कामे होण्यासाठी पैश्याची अपेक्षा ठेवली जात असल्याच्या संतप्त भावना आंदोलक शिक्षकांनी व्यक्त केल्या.

या आंदोलनात माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेंद्र लांडे, सरचिटणीस आप्पासाहेब शिंदे, एम.एस. लगड, उध्दव गुंड, हरिश्चंद्र नलगे, भिमराज खोसे, जनार्धन पटारे, उध्दव गायकवाड, राजेंद्र खेडकर, रमजान हवालदार, धनंजय म्हस्के, महावीर नारळे, बाळासाहेब भोर, प्रशांत होन, संभाजी गाडे, नंदकुमार शितोळे मंगेश काळे, धनंजय गिरी, बाबासाहेब गुंजाळ, युवराज भोसले, जगन्नाथ आढाव, देविदास पालवे आदिंसह माध्यमिक शिक्षक सहभागी झाले होते.

Related Stories

No stories found.