शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांबाबत शिक्षणमंत्र्यांसमवेत बैठक

आमदार डॉ. तांबे यांचा पुढाकार; अनुकंपासह पायाभूत वाढीव पदांचा प्रश्न मार्गी लागणार
शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांबाबत शिक्षणमंत्र्यांसमवेत बैठक

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

राज्यातील नव्याने 20 टक्के अनुदान प्राप्त झालेल्या सर्व शिक्षकांना (Teachers) शालार्थ आयडी देऊन सप्टेंबर 2021 चे वेतन ऑनलाईनप्रमाणे काढणे याचबरोबर पायाभूत वाढीव पदांचे प्रस्ताव व अनुकंपाबाबतचे प्रलंबित प्रश्नांसह विविध प्रश्नांबाबत नाशिक पदवीधर मतदार संघाचे (Nashik Graduate Constituency) आमदार डॉ. सुधीर तांबे (MLA Sudhir Tambe) यांच्या पुढाकारातून मंत्रालयात शिक्षण मंत्र्यांसमवेत (Minister of Education) झालेल्या बैठकीतून सर्व प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहेत.

मुंबई मंत्रालय (Ministry of Mumbai) येथे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांच्या उपस्थितीत शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांबाबत प्रत्यक्ष ऑनलाईन बैठक संपन्न झाली. यावेळी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे (MLA Dr. Sudhir Tambe), आमदार बाळाराम पाटील, आमदार विक्रम काळे, आमदार जयंत आजगावकर, आमदार अभिजित वंजारी, आमदार किरण सरनाईक, शिक्षण सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, शिक्षण उपसचिव काझी, शिक्षण संचालक दिनकर जगताप तसेच शिक्षण विभागातील संबंधित अधिकारी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी राज्यातील शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा 10: 20 :30 च्या सुधारित आश्वासित प्रगती योजनेचे मंजूर करून घेण्यासाठी लवकरच वित्तमंत्री यांच्याकडे बैठक, तसेच राज्यातील शिक्षक कर्मचार्‍यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यासाठी जी दिरंगाई होते आहे. त्याबाबत सहानुभूतीपूर्वक निर्णय घेण्यात येईल, याचबरोबर राज्यातील वाढीव पदांचे प्रस्ताव दोन तीन दिवसांत शासनाकडे पाठवले जातील तसेच नव्याने 20 टक्के अनुदान प्राप्त झालेल्या सर्व शिक्षकांना शालार्थ आयडी देऊन सप्टेंबर 2021 चे पेमेंट ऑनलाईन काढणे बाबत नामदार वर्षाताई गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी संबंधित विभागाला सूचना केल्या आहेत. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे (MLA Dr. Sudhir Tambe) आणि शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत पाठपुरावा केला असून त्यांच्या मागणीनुसार राज्यातील केंद्र शासन पुरस्कृत आयसीटी शिक्षकांना मानधनावर सेवेत सामावून घेण्याबाबत लवकर केंद्राकडे प्रस्ताव करण्यात येईल, असेही शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी सांगितले आहे.

यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar), महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) व शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांच्या मार्गदर्शनाखाली महा विकास आघाडी सरकारने शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांबाबत अत्यंत सकारात्मक पाऊल घेतले आहे. अनुकंप प्रश्न, पायाभूत पदे बाबतचा निर्णय, शिक्षकांना शालार्थ आयडी देणे (School ID to Teachers), प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अघोषित वर्ग, तुकड्या शाळांचे प्रस्ताव सप्टेंबर 2021 पर्यंत शासनशकडे पाठवणे असे विविध प्रश्न मार्गी लागली आहेत. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे मुख्य साधन आहे. या विभागाकडे महाविकास आघाडी सरकार अत्यंत सकारात्मक पाहत असून उर्वरित प्रश्न लवकर मार्गी लागतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आ. डॉ. तांबे (MLA Dr. Sudhir Tambe) यांच्या पाठपुरावाने शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न मार्गी लागले जात असल्याने राज्यभरातील शिक्षक संघटना, शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांसह विविध विभागातून आमदार डॉ.तांबे यांचे अभिनंदन होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com