शिक्षकांचे मंत्रालयातील प्रलंबित प्रस्ताव मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार - आ. रोहित पवार

शिक्षक संघ व गुरूमाऊलीने मांडले विविध प्रश्न
शिक्षकांचे मंत्रालयातील प्रलंबित प्रस्ताव मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार - आ. रोहित पवार
आ . रोहित पवार

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कर्जत येथे राज्य शिक्षक संघ व गुरुमाऊली मंडळाच्यावतीने आ. रोहित पवार यांना विविध प्रलंबित मागण्यांविषयी निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा संघाचे अध्यक्ष बापूसाहेब तांबे यांनी आ. पवार यांना शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांविषयी माहिती दिली. मागील दोन वर्षांपासून प्राथमिक शिक्षक ड्युटीवर असताना मृत्युमुखी पडले. त्यांना शासनाकडून मिळणारी 50 लाख रुपयांची मदत मिळण्याची प्रक्रिया सुलभ होऊन हा लाभ लाभार्थीपर्यंत लवकरात लवकर मिळण्यासाठी आ. पवार यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली.

प्राथमिक शिक्षकांच्या वैद्यकीय बिलांसाठी व इतर पुरवणी देयकांसाठी निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी करण्यात आली. त्याचप्रमाणे पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्ताराधिकारी यांची रिक्त पदे पदोन्नतीने 100 टक्के शिक्षकांमधून भरण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली. पदवीधर शिक्षकांची वेतनश्रेणी तसेच 2016 नंतर वरिष्ठ वेतन श्रेणी मिळालेल्या शिक्षकांच्या वेतनाबाबतच्या त्रुटी दूर करण्याविषयी चर्चा करण्यात आली. एमएससीआयटी उत्तीर्ण होण्यासाठी मुदत वाढवून मिळावी अशी आग्रही मागणी करण्यात आली. त्याच पद्धतीने डीसीपीएस बांधवांच्या कपात झालेल्या रकमांचा हिशोब तातडीने मिळवून एनपीएस कार्यवाहीबाबत एकवाक्यता आणावी याविषयी चर्चा करण्यात आली.

या शिष्टमंडळात बँकेचे माजी चेअरमन साहेबराव अनाप, शरद सुद्रिक, बाळासाहेब तापकीर, अनिल टकले, आबासाहेब सूर्यवंशी, दत्तात्रय राऊत, सूर्यकांत काळे, किशोर माकुडे, अनिल नरसाळे, अविनाश बचाटे, बाळासाहेब वाघमारे, नवनाथ दिवटे, राम शेटे, सुनील बेलकर, संतोष डहाळे, रामचंद्र राजापुरे, बाळासाहेब बोरकर, उद्धव घालमे, संदीप ठानगे, नारायण पिसे, विठ्ठल सुद्रीक बजरंग गोडसे, ईश्वर सोलनकर, ज्ञानदेव सुद्रीक, अमोल गांगर्डे, योगेश खेडकर, राजेंद्र सकट, कुंडलिक सूर्यवंशी, कैलास गांगर्डे, सचिन गांगर्डे व इतर संघ व गुरू माऊली प्रेमी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.